राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठास भेट
नाशिक : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठास भेट दिली. यावेळी विद्यापीठाच्या कुलगरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प वि से प, अ वि से प, वि से प यांच्या समवेत विद्यापीठाच्या ’ग्रीन कॅम्पसची’ पहाणी केली.

याबाबत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले की, विद्यापीठाचा परिसर पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय सुंदर असून मोठया प्रमाणात करण्यात आलेली वृक्षलागवडीने तो विलोभणीय झाला आहे. ग्रीन कॅम्पसमध्ये लावण्यात आलेली विविध प्रजातींच्या वनस्पती व वृक्षांमुळे प्राणी व पक्ष्यांसाठी अनुकुल वातावरण निर्माण झाले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी आदर्श घ्यावा असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठातर्फे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे, यावेळी विद्यापीठाच्या महिला तक्रार निवारण समितीच्या सदस्या शिल्पा पवार, जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी स्वाती कलाल महिला आयोगाच्या सह सचिव शालिनी रस्तोगी उपस्थित होत्या.