मिल्लीया महाविद्यालयात नशा मुक्त भारत अभियान संपन्न
बीड : मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागने नशा मुक्त भारत अभियान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहम्मद इलयास फाजील, उपप्राचार्य डॉ सय्यद हनीफ, उपप्राचार्य हुसैनी एस एस राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रो मिर्झा असद बेग, डॉ शेख रफीक, प्राध्यापिका डॉ शेख एजाज परवीन, पदव्युत्तर विभागाचे संचालक प्रा फरीद नेहरी, नॅक समन्वयक डॉ अब्दुल अनिस यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ शेख रफीक यांनी केले. मादक पदार्थांच्या गैरवापरास प्रतिबंध करण्याकरता व भारताला अंमली पदार्थ मुक्त बनविण्याच्या दृष्टिकोनातून “नशा मुक्त भारत अभियान” राबविण्यात येत असून यावर्षीची संकल्पना “विकसित भारत का मंत्र भारत हो नशेसे स्वतंत्र” अशी आहे. अमली पदार्थाची सेवन व अवैद्य तस्करी विरोधात घेतलेल्या विषयांवर जनजागृती करण्यात येते तसेच अमली पदार्थाच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहम्मद इलयास फाजील यांनी निरोगी आरोग्यासाठी नशा मुक्त भारत संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी व आरोग्य चांगले राहण्यासाठी सर्वांनी व्यसनमुक्त राहावे असे सांगितले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रो मिर्झा असद बेग यांनी सर्वांनी आपले महाविद्यालय, परिसर व घर व्यसनमुक्त करण्याकरता व इतरांना अंमली पदार्थाचा परित्याग करावा व नशा मुक्त भारत व्हावा यासाठी प्रयत्नशील राहण्याची शपथ राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी – विद्यार्थिनी, प्राध्यापक वृंद व कर्मचारी वृंद यांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ शेख रफीक यांनी केले. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी – विद्यार्थिनी, प्राध्यापकवृंद, कर्मचारीवृंद यांची उपस्थिती होती.