नागपूर विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी यश नरड यांची DST इन्स्पायर फेलोशिपसाठी निवड
नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थी यश देवानंद नरड यांची २०२४ या शैक्षणिक सत्रात विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, नवी दिल्लीच्या इन्स्पायर फेलोशिपसाठी निवड झाली अहे. शैक्षणिक सत्र २०२४ मधे विद्यापिठ परीसरातून यश नरड या एकमात्र विद्यार्थ्यांची इन्स्पायर फेलोशिपसाठी झालेली निवड हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाला मोठा बहुमान आहे.

यश हा भौतिकशास्त्र विभागातील डॉ संजय ढोबळे यांचा मार्गदर्शनात संशोधक विद्यार्थी म्हणून एलईडी व सोलर सेलची कार्यक्षमता वाढविण्यासाठी पेरोवस्काइट मटेरियलचे नाविन्यपूर्ण निर्माण व त्यांची उपयोगिता सिध्द करण्यासाठी कार्यरत आहे. त्यामुळे एलईडी व सोलर सेलचे कार्यक्षमता वाढल्यामुळे विजेचे बचत व निर्मिती होणार आहे. हे आजच्या विजेच्या तुटवळ्यामध्ये फार मोठे संशोधनाचे योगदान राहणाथ आहे.
यश नरडला DST ची इन्स्पायर फेलोशिप मिळाल्याबद्दल विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकरे, प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ राजू हिवसे, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ ओमप्रकाश चिमनकर, मार्गदर्शक डॉ संजय ढोबळे व इतर प्राध्यापक व संशोधकांनी अभिनंदन व्यक्त केले आहे. यश आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना देतो.