नागपूर विद्यापीठाचा पुरुष कबड्डी संघ झुंझुनू येथील पश्चिम क्षेत्रिय आंतरविद्यापीठ स्पर्धेत होणार सहभागी

विद्यापीठाचा पुरुष कबड्डी संघ घोषित

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पुरुष कबड्डी संघ घोषित करण्यात आला आहे. झुंझुनू येथील श्री जगदीशप्रसाद छाबरमल तिब्रेवाला विद्यापीठात आयोजित पश्चिम क्षेत्रिय आंतरविद्यापीठ स्पर्धेत विद्यापीठाचा संघ सहभागी होणार आहे. श्री जगदीशप्रसाद छाबरमल तिब्रेवाला विद्यापीठात ही स्पर्धा शनिवार, दिनांक १९ ऑक्टोबर ते गुरुवार, दिनांक २४ ऑक्टोंबर २०२४ दरम्यान होणार आहे.

Advertisement

पुरुष कबड्डी संघामध्ये वंश मुदलियार, संकेत शेंडे, गणेश गायधने, आदित्य पांगूळ, तेजस सुर्यवंशी, रितिक सावरकर, संकेत आदमाने, पार्थ नागरे, प्रज्वल कंगाळे, एन. चिन्नम नायडू, सुधांशू चौधरी, महेश ढोले यांचा समावेश आहे. विद्यापीठाचे प्रशिक्षक म्हणून डॉ भरत मेहता, संघ व्यवस्थापक म्हणून डॉ नितीन गुल्हाणे काम बघणार आहे. आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे, कुलसचिव डॉ राजू हिवसे, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ संचालक डॉ विशाखा जोशी, विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ संजय चौधरी आणि प्रा मनोज अंबाडकर यांनी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page