नागपूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन महिला व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न
महिला हॉलीबॉल स्पर्धेत जीएस कॉलेज वर्धा विजयी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महिलांच्या आंतर महाविद्यालयीन वॉलीबॉल स्पर्धा शासकीय विज्ञान संस्था नागपूर येथे पार पडल्या. या स्पर्धांमध्ये अंतिम सामन्यात जीएस कॉलेज वर्धा संघाने रामदेवबाबा संघाचा २५-१९ व २५-१२ असा पराभव केला.
जीएस कॉलेज वर्धा कडून श्रुती डुमणे, कांचन रहागाटे, दीक्षा भोंगाडे यांचा खेळ उत्कृष्ट झाला तर रामदेवबाबा कॉलेजकडून श्रुती व माहीने उत्कृष्ट कामगिरी केली. अंतिम सामन्याला प्रमुख पाहुणे म्हणून एसीपी शालिनी शर्मा व ॲड भाग्यश्री चावजी या दोन्ही वॉलीबॉलच्या राष्ट्रीय खेळाडू उपस्थित होत्या.
शासकीय विज्ञान संस्थेचे संचालक डॉ जयराम खोब्रागडे, विद्यापीठाच्या पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ माधवी मार्डीकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तृतीय स्थान केडीके महाविद्यालय, नागपूर यांनी पटकावले तर हरिभाऊ आदमने कॉलेज,, सावनेर यांना चतुर्थ स्थान प्राप्त झाले. रसिका व पूर्वा यांनी केडीके कॉलेजमधून उत्कृष्ट खेळल्या तर हरिभवत बने कॉलेजमधून सुहानी व मीनल यांचा खेळ उत्कृष्ट झाला.
स्पर्धा यशस्वी करण्याकरिता डॉ सुनील कापगते, वृषाली देशमुख, लॉर्डन टू नाईट शुभम सैनी, रोशनी खोब्रागडे, रजनी मुरकुटे यांनी अथक परिश्रम घेतले.