राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा जयंती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात मंगळवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०१४ रोजी आयोजित कार्यक्रमात विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे व कुलसचिव डॉ राजू हिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली आस्थापना विभागाचे उपकुलसचिव संजय बाहेकर यांच्या शुभहस्ते डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी सहाय्यक कुलसचिव गणेश कुमकुमवार, अधीक्षक राकेश कोपुलवार, यूडीसी शैलेश राठोड, जनसंपर्क अधिकारी प्रेमदास वाडकर यांच्यासह शिक्षक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.