नॅक आणि एआयसीटीईच्या अध्यक्षांनी अलार्ड विद्यापीठाच्या लोगोचे केले अनावरण
औद्योगिक क्षेत्राच्या मागण्या नुसार शिक्षण दयावे – डॉ टी जी सीताराम, अध्यक्ष, एआयसीटीई
पुणे : आजच्या वातावरणात औद्योगिक क्षेत्राच्या मागण्या लक्षात घेऊन शिक्षण क्षेत्राने काम केले पाहिजे. अशा परिस्थितीत देशातील पहिले अलार्ड विद्यापीठ ८० टक्के प्रात्यक्षिक शिक्षण घेऊन शिक्षण क्षेत्रात उतरत आहे. असे प्रशंसनीय मत एआयसीटीईचे चेअरमन डॉ टी जी सीताराम यांनी मांडले. सेंटर फॉर एज्युकेशन ग्रोथ अँड रिसर्च संस्थे द्वारे दिल्ली येथे आयोजित केलेल्या ‘थर्ड समिट ऑन विजन २०४७ इन एज्युकेशन’ परिषदेत अलार्ड विद्यापीठाच्या लोगो चे अनावरण एआयसीटीईचे चेअरमन डॉ टी जी सीताराम, नॅकचे अध्यक्ष प्रा अनिल सहस्त्रबुद्धे आणि अॅलार्ड विद्यापीठाचे संस्थापक व कुलाधीपती डॉ एल आर यादव यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
डॉ टी जी सीताराम म्हणाले, विद्यार्थ्यांना ७० टक्के प्रॅक्टिकल व ३० टक्के थेअरी देणारे हे पहिले विद्यापीठ आहे. शिक्षण क्षेत्रात स्तुत्य पाऊल उचलणे ही मोठी गोष्ट आहे. ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी निश्चितच होईल. या शिवाय स्टार्टअपमध्ये आवड असलेले आपले भविष्य घडवू शकतात.
नॅकचे अध्यक्ष प्रा अनिल सहस्त्रबुद्धे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून यशासाठी शुभेच्छा दिल्यात.
डॉ एल आर यादव म्हणाले, नवीन दृष्टी, नेतृत्व, दक्षता, कठोर परिश्रम आणि समर्पण या पाच स्तंभाच्या आधारे अलार्ड विद्यापीठ आता शैक्षणिक उत्कृष्टतेला चालना देईल. ‘हम अलग है, हम अलार्ड है’ यामुळे येथे विद्यार्थ्यांना १०० टक्के इंटर्नशिपची हमी देखील मिळेल. भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून गुरू शिष्य परंपरा चालत आली असून ही परंपरा पुढे नेण्याचे काम विद्यापीठात अविरतपणे सुरू आहे. अशा परिस्थितीत शिक्षण जगात नव्या क्रांतीची सुरूवात करणार्या अॅलार्ड विद्यापीठाच्या नव्या लोगोचे नुकतेच अनावरण करण्यात आले.