आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा ‘स्पंदन-2024’ राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव साहित्य विभागाच्या स्पर्धा संपन्न

मुंबई : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा ‘स्पंदन-2024’ सांस्कृतिक युवा महोत्सवातील साहित्य विभागाच्या स्पर्धा मुंबई येथील सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीचे सुनंदा प्रविण गंभिरचंद परिचर्या महाविद्यालयात संपन्न झाल्या. या स्पर्धेच्या समारोप समारंभास व्यासपीठावर विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) पविसेप, अविसेप, विसेप, प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ, सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दिलीप त्रिवेदी, चेअरमन प्रविण शहा, सचिव डॉ भरत पाठक, खजिनदार अतुल संघवी, सुनंदा प्रविण गंभिरचंद परिचर्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ शिल्पा शेट्टीगार, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ देवेंद्र पाटील, बाल साहित्यिक रमेश तांबे, लघुचित्रपटकार सचिन सुरेश आदी मान्यवर  उपस्थित होते.

याप्रसंगी कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर कलागुणांना वाव मिळावा यासाठी स्पंदन हा उपक्रम महत्वपूर्ण आहे. वेगवेगळया विद्याशाखांचे विद्यार्थी आपले कला-गुण सादर करण्यासाठी कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र येतात. स्पर्धेच्या निमित्ताने होणारा संवाद भविष्यात स्पर्धकांना उपयोगी ठरतो. कला सादर करणे ही एक मनाची मशागत आहे. आरोग्य शिक्षण क्षेत्रात मानसिक संतुलनाकरीता ‘स्पंदन’ सारख्या स्पर्धा उर्जा व्दिगुणीत करण्याचे काम करतात. विविधी क्षेत्रातील गुण व कौशल्य वाढीकरीता हा उपक्रम महत्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांचा मोठया प्रमाणात सहभाग व उत्साह वाखाणण्याजोगा असल्याचे त्यांनी संागितले.

Advertisement

याप्रसंगी विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, विद्यापीठाचा ‘स्पंदन’ युवा महोत्सव सगळयांसाठी उर्जेचा स्त्रोत आहे. यावर्षी स्पंदन युवा महोत्सव राज्यातील विभागात विविध वेगवेगळया कलाप्रकारांची विभागणी करुन साजरा करण्यात आला. प्रत्येक ठिकाणी स्पर्धेकांची संख्या व उत्साह मोठया प्रमाणात आहे. नियमित अभ्यासाव्यतीरिक्त अन्य कलाप्रकारात विद्यार्थ्यांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी बाल साहित्यिक रमेश तांबे यांनी मनोगतात सांगितले की, कलागुणांच्या बाबतीत आजची पिढी संवेदशिल आहे. आजची युवापिढी वकृत्वाबाबत ज्या पध्दतीने विचार करते त्या भावना व्यक्त करण्यासाठी युवापिढीचे विचार प्रकट करण्यासाठी विद्यापीठाने ‘स्पंदन’च्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे ही एक चांगली बाब आहे. त्यांना या माध्यमातून आपली मतं, भावना व विचार व्यक्त करता येतात असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी सिनेदिग्दर्शक सचिन सुरेश यांनी मनोगतात सांगितले की, विद्यार्थी दशेत कलागुणांच्या वाढीसाठी स्पंदन महत्वपूर्ण आहे. आजच्या युवा पिढीयुवापिढीचे विचार प्रकट करण्यासाठी विद्यापीठाने ‘स्पंदन’च्या हे उत्तम माध्यम आहे. स्पंदनाच्या व्यासपीठावरुन आपले मतं, भावना व विचार व्यक्त स्पर्धकांना सर्वांसमोर मांडता येतात असे त्यांनी सांगितले.

‘स्पंदन-2024’ सांस्कृतिक युवा महोत्सवात साहित्य क्षेत्रात आयोजित स्पर्धेत विजेत्यांचे विद्यापीठ परिवारातर्फे कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनंदा प्रविण गंभिरचंद परिचर्या महाविद्यालयाचे अध्यक्ष दिलीप त्रिवेदी यांनी केले. विद्यापीठातर्फे उपकुलसचिव डॉ नितीन कावेडे, जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे, सहायक कुलसचिव संजय देशमुख, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता बाळासाहेब पेंढारकर, राजेश इस्ते स्पर्धेचे समन्वयक होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता चोपडेकर यांनी केले. ‘स्पंदन-2024’ स्पर्धेत विजेते विद्यार्थ्यांचा मान्यवरांकडून बक्षिस व प्रमाणपत्र देण्यात आले. सर्व पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page