सौ.के.एस.के. महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह संपन्न
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 साठी सकारात्मक रहावे – प्राचार्य डॉ.प्रीती पोहेकर
बीड : येथील सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह दिनांक 24 जुलै ते 29 जुलै 2023 या काळात विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात येत आहे.त्यात सकाळी प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 के लिए है तैयार हम हे फलक घेऊन महाविद्यालयाच्या परिसरात रॅली काढण्यात आली.
ग्रंथालयाच्या वतीने नविन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयात स्वातंत्र्य वीर सावरकर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.प्रीती पोहेकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जाणीव जागृती व अंमलबजावणी या विषयावर व्याख्यान झाले.आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात नविन शैक्षणिक धोरण का ? या संदर्भात अभ्यासपूर्ण माहिती त्यांनी दिली.आजच्या काळात कालबाह्य व बुरसटलेले अभ्यासक्रम शिकविले जातात त्यामुळे विकसनशील देशातील विद्यापीठ स्थानीक गरजांपासून विभक्त आहेत.जागतिक सिंगापूर,कॅनडा,चीन,जपान या देशातील विद्यापीठांचे नियोजन औद्योगिक वसाहतीशिवाय त्यांचे नियोजन नाही. आज वर्गखोली बाहेर जाऊन अभ्यास संशोधन करणे गरजेचे आहे.जीर्ण झालेल्या कल्पना सोडून नव कल्पना व सृजनशील संशोधन नवज्ञानाकडे आपण वळलो पाहिजेत.आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोणत्याही टप्यावर विषय बदलता येतील.चार वर्षाच्या शैक्षणिक धोरणात प्रमाणपत्र,पदवीका,पदवी,पदव्युत्तर शिक्षण घेता येईल. तसेच विद्यार्थ्यांना अनेक विषयाचे ज्ञान,पदवीका,अभ्यासक्रम करता येईल.शैक्षणिक कर्ज घेऊन शिक्षण घेता येईल बहुशाखीय विद्यापीठे प्रौढ शिक्षण,भारतीय भाषा कला व संस्कृतीचा बढावा विद्यार्थ्यांना घेता येईल.नविन शैक्षणिक धोरण हे जात,वंश,लिंग वर्णभेद विरहीत असून सर्वांना समता,व्यक्तीगत स्थान,गुणवत्ता पूर्ण शिक्षण तीन ते अठरा वर्ष वयापर्यंत मोफत शिक्षण मिळेल.अमलबजावणीसाठी विद्यार्थी व शिक्षक यांची सकारात्मक मानसिकता बदलली पाहिजे असे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीसाठी सर्वांनी तयार रहावे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अमलबजावणीच्या अनुषंगाने सौ.के.एस.के.महाविद्यालय सकारात्मक भूमिकेत असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत बीड जिल्हयातून प्रातिनिधीक स्वरूपात नविन शैक्षणिक धोरणाच्या अमलबजावणीसाठी हे महाविद्यालय निवडले गेले तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भात जिल्हयातील प्राचार्यांची कार्यशाळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू,प्रकुलगुरू, अधिष्ठाता यांच्या उपस्थितीत महाविद्यालयात सप्टेबर 2022 मध्ये आयोजित करण्यात आली होती. या संदर्भात त्यांनी महाविद्यालया विषयी माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ.संजय पाटील देवळाणकर,डॉ.सतीश माऊलगे,उपप्राचार्य डॉ.नारायण काकडे,पर्यवेक्षक प्रा.जालींदर कोळेकर व महाविद्यालयातील प्राध्यापक,विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शंकर राऊत व पाहुण्यांचा परिचय प्रा.शरद पवार तर आभार डॉ.संतोष तळेकर यांनी मानले.