सौ.के.एस.के. महाविद्यालयामध्ये कारगिल विजय दिन व सत्कार संपन्न
सौ.के.एस.के. महाविद्यालयामध्ये कारगिल विजय दिन व सत्कार संपन्न
बीड : सौ.के. एस. के. महाविद्यालयातील एनसीसी विभागाच्या वतीने आज 24 वा कारगिल विजय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत व कारगिल युद्धात शहीद झालेल्या सर्व जवानांना सर्वप्रथम अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रमुख सुभेदार मेघराज कोल्हे (सेना मेडल) हे होते.
सुभेदार मेघराज कोल्हे हे नोव्हेंबर 1997 मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले. ते 2 Para special force चे सदस्य होते. त्यांनी भारतीय सैन्यात एकूण 22 वर्षे सेवा दिली, या कालावधीत 2002 मध्ये त्यांना सेना मेडल ने गौरविण्यात आले. आजच्या कारगिल विजय दिनानिमित्त त्यांनी विद्यार्थ्यांना कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या वीरांच्या गौरवगाथा व कार्य विद्यार्थ्यांना परिचीत करून दिले. तसेच पुढे त्यांनी कारगिल युद्धातील त्यांचा आग्रा येथील सहभाग व कार्याबद्दल आणि जम्मू काश्मीर मधील शाळेतील आतंकवादी विरोधी ऑपरेशन मधील स्वतःचा अनुभव विद्यार्थ्यांना सांगून विद्यार्थ्यांनां देशासाठी लढण्याची प्रेरणा दिली. पुढे भारतीय सैन्यात व पोलीस दलात भरती होण्यासाठी मार्गदर्शनही केले. पुढे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना अध्यक्षीय भाषणात, देशप्रेम व राष्ट्रभक्ती, शिस्तपालन व कठोर परिश्रम, ही मूल्य एनसीसी प्रशिक्षणात शिकवली जातात हे खरोखरच स्तुत्य आणि चांगले आहे.
विद्यार्थ्यांनी याचा चांगला फायदा घेऊन भारतीय सैन्य दलात व पोलीस दलात निश्चितच सेवा करण्यासाठी अग्रेसर राहिले पाहिजे. एनसीसी विभाग नेहमीच चांगले कार्य करतो, या पुढे ही या विभागाने आणखीन अशीच छान प्रगती करावी व असेच विद्यार्थ्यांना देशसेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. यावेळी पोलीस दलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा नवगण शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ.दीपाताई क्षीरसागर यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एनसीसी प्रमुख कॅप्टन डॉ.पोटे बी.टी.यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळाणकर, उप प्राचार्य डॉ.शिवाजी शिंदे,उपप्राचार्य कनिष्ठ विभाग डॉ.नारायण काकडे पदव्युत्तर विभागाचे संचालक डॉ.सतीश माउलगे, पर्यवेक्षक श्री जालिंदर कोळेकर, कार्यालयीन अधीक्षक डॉ.विश्वंभर देशमाने,शिक्षक कर्मचारी आणि एन.सी.सी.चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.