के एस के महाविद्यालयात लोकनेत्या माजी खासदार स्व केशरबाई क्षीरसागर यांची जयंती साजरी
बीड : केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात बीडच्या लोकनेत्या माजी खासदार स्व केशरबाई क्षीरसागर ऊर्फ काकू यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी बोलताना प्राचार्य म्हणाले की, बीड जिल्ह्याच्या शिक्षण,सहकार क्षेत्राच्या जननी आणि अशिया खंडातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याच्या संस्थापक तसेच बीड च्या रेल्वे प्रश्नाला दिल्लीपर्यंत पोहचवणार्या पहिल्या महिला खासदार होत्या. बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा ओळखला जात होता. यांच्यासाठी शिक्षणाची गंगा गोरगरिबा पर्यंत पोहोचविण्याचे कार्य काकूंनी केले. त्यांच्यामुळे आज बीड जिल्हयात शैक्षणिक वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या एकूण जीवन व कार्याचा परिचय त्यांनी करून दिला.
या वेळी पदव्युत्तर संचालक डॉ सतिश माऊलगे, उपप्राचार्य डॉ नारायण काकडे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर, डॉ सुधाकर गुट्टे, कार्यालयीन अधिक्षक डॉ विश्वांभर देशमाने तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कर्मचारी प्रतिनिधी डॉ विनायक चौधरी यांनी मानले.