पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिला कबड्डी स्पर्धेत यजमान अमरावती संघासह नागपूर आणि पुणे विद्यापीठाची आगेकूच

अमरावती : स्थानिक शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिला कबड्डी स्पर्धेत स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी यजमान अमरावती सह नागपुर आणि पुणे विद्यापीठ संघाने दमदार कामगिरीच्या भरोशावर आपल्या संघाला पुढील फेरीत प्रवेश मिळून दिला. उद्यापासून मागच्या वर्षी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत सहभागी झालेले भारतीय विद्यापीठ पुणे, कोटा विद्यापीठ कोटा, मुंबई विद्यापीठ, मुंबई आणि स्वारातीम विद्यापीठ नांदेड हे संघ स्पर्धेत सहभागी होणार असल्यामुळे या स्पर्धा चांगल्या चुरशीच्या होणार आहे.

प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात यजमान संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संघाने चारोत्तर विद्यापीठ गुजरात या संघाचा ५१ विरुद्ध १० असा तब्बल ४१ गुणांनी पराभव करत दमदारपणे पुढील फेरीत प्रवेश केला. अमरावती विद्यापीठ संघातर्फे मंजुळा पवार, अक्षदा धानोरकर आणि पायल या खेळाडूंनी उत्कृष्ट चढाई करत आपल्या संघाला नेत्र दीपक यश प्राप्त करून दिले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संघाने चुरशीच्या लढतीत देवी अहिल्याबाई विद्यापीठ इंदोर या संघाचा ४३ विरुद्ध ३२ असा ११ गुणांनी पराभव केला. नागपूर विद्यापीठातर्फे साक्षी त्रिवेदी, श्वेता रत्नपारखी आणि प्रांजल या खेळाडूंची खेळी सर्वोत्तम ठरली. मुंबईच्या एसएनडीटी विद्यापीठ संघाने शिखरच्या पीडीयूसी विद्यापीठाचा ३९ विरुद्ध २९ असा दहा गुणांनी पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. मुंबई संघातर्फे हर्षदा खोत आणि ज्योती धाकडे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. एकतर्फी झालेल्या सामन्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गोविंद गुरु ट्रायबल विद्यापीठ बंदसारा विद्यापीठाचा ४८ विरुद्ध २ असा तब्बल ४६ गुणांनी पराभव केला. पुणे विद्यापीठ संघातर्फे स्नेहा पावरा अपर्णा मुरकुटे आणि पूजा क्रमावत यांची खेळी प्रशंसनीय अशी ठरली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर या संघाला स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पराभवाचा सामना करावा लागला. या संघाला जे पी जे टी विद्यापीठ झणझुणू या संघाने ३२ विरुद्ध २३ असा ९ गुणांनी प्रभाव केला.

Advertisement

अत्यंत चुरशीची आढळलेल्या नॉर्थ गुजरात विद्यापीठ पाटण या संघाने अवधी प्रताप सिंग विद्यापीठ रेवा या संघाचा २७ विरुद्ध २५ असा २ गुणांनी प्रवाह केला. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात पाटण विद्यापीठात तर्फे निर्मल आणि प्रतीक्षा या खेळाडूंनी आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात भरीव असे योगदान दिले. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ १३ गुणांनी बरोबरीत होते. त्याचप्रमाणे अन्य सामन्यात राजस्थान विद्यापीठ संघाने राणी दुर्गावती विद्यापीठ जबलपूर या संघाचा ३० विरुद्ध २१ असा ९ गुणांनी प्रभाव केला. विजयी संघातर्फे अनिता सैनि आणि कामीका शर्मा यांनी या सामन्यात भरीव असे योगदान दिले.

महाराजा गंगा सिंग विद्यापीठ बिकानेर या संघाने कवियत्री नॉर्थ विद्यापीठ जळगाव या संघाचा ४८ विरुद्ध १० असा ३८ गुणांनी प्रभाव केला. गुजरात विद्यापीठ नवरंगपुरा अहमदाबाद या संघाने बंसली विद्यापीठ राजस्थान या संघाचा ४३ विरुद्ध १७ असा २३ गुणांनी एकतर्फी पराभव केला. महर्षी दयानंद विद्यापीठ अजमेर संघाने मन्सूर फिजिकल एज्युकेशन विद्यापीठ मन्सूर या संघाचा ४० विरुद्ध ७ असा ३३ गुणांनी फडशा पडला. विवेकानंद ग्लोबल विद्यापीठ जयपूर संघाने महाराजा बुंदेलखंड विद्यापीठ छत्रपूर या संघाचा ५५ विरुद्ध ७ असा पराभव केला.

आज झालेल्या स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे आहे.

महाराजा सयाजी विद्यापीठ बडोदा मात राजस्थान विद्यापीठ जयपूर १५ विरुद्ध ७.

राजा शंकर शहा विद्यापीठ शिंदवाडा मात सौराष्ट्र विद्यापीठ राजकोट ४९ विरुद्ध २१.

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा मात जय नारायण व्यास विद्यापीठ जोधपुर ४२ विरुद्ध २०.

राणी दुर्गावती जबलपूर विद्यापीठ मात मोहनलाल सुखाडिया विद्यापीठ उदयपूर ३६ विरुद्ध १६.

जे पी जे टी विद्यापीठ झुनझुन राजस्थान गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली ५१ विरुद्ध २१.

महाराजा गंगा सिंग विद्यापीठ बिकानेर मात महाराजा भावनगर विद्यापीठ भावनगर ३७ विरुद्ध ७.

देवी अहिल्या विद्यापीठ इंदोर मात खुशालदास विद्यापीठ हनुमानगड ४३ विरुद्ध ३२.

महर्षी दयानंद विद्यापीठ अजमेर मात डॉ सुभाष विद्यापीठ जुनागड ५२ विरुद्ध ७.

आज या स्पर्धेचा तिसरा दिवस राहणार असून आज आणखी चुरशीच्या सामन्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्पर्धा संयोजक डॉ सुभाष गावंडे यांच्या मार्गदर्शनात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक हे परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page