यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासोबत विविध नामवंत संस्थांशी सामंजस्य करार

नाशिक :  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत दूरशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना रोजगार संधी देणाऱ्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 वर आधारीत अभ्यासक्रमांसाठी नामांकीत मान्यवर संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले.

MoU with Yashwantrao Chavan Maharashtra Open University and various reputed institutions
????????????????????????????????????

यामध्ये 1. सुपरमाइंड फाऊंडेशन – मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्रावरील संशोधनासाठी शिक्षकांना प्रादेशिक भाषेत सारांश विकसित करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करणे हा या सहकार्याचा मुख्य उद्देश आहे. 2. स्किल्स फॅक्टरी लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड, – सायबर सिक्युरिटी कोर्सेस यात यूजीसी अभ्यासक्रमावर आधारित यूजी आणि पीजीसाठी क्रेडिट आधारित अभ्यासक्रम. 3. यशस्वी स्किल्स लिमिटेड – शिका आणि कमवा” हा उपक्रम राबविणे. 4.  राजयोग एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन (आरईआरएफ), माउंट आबू, राजस्थान – या सामंजस्य कराराचा उद्देश उच्च शिक्षण आणि संलग्न क्षेत्रातील योग, अध्यात्म आणि मूल्य शिक्षणातील कार्यक्रम प्रदान करणे. यामध्ये डिप्लोमा इन व्हॅल्यूज अँड स्पिरिच्युअल एज्युकेशन (१ वर्षे), अॅडव्हान्स डिप्लोमा इन व्हॅल्यूज अँड स्पिरिच्युअल एज्युकेशन (2 वर्षे), अॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन कौन्सिलिंग अँड मेंटल हेल्थ (1 वर्ष) हे शिक्षणक्रम राबविण्यात येणार आहे. 5. ड्रोन कॉर्पोरेशन प्रा.लि., नाशिक – विविध ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश जसे: डीजीसीए मंजूर रिमोट पायलट लायसन्स, ड्रोन सिस्टम इंट्रोडक्टरी प्रोग्राम, ड्रोन सिस्टम इंटरमीडिएट प्रोग्राम, ड्रोन सिस्टम एडवांस्ड प्रोग्राम 6. बहाई ॲकाडमी, पाचगणी  – या सहकार्याच्या माध्यमातून शिक्षण समुपदेशक तसेच प्राध्यापकांना अकादमीने तयार केलेल्या मॉड्यूलचा अनुभव घेण्याची आणि नैतिक क्षमता आणि सहकारी शिक्षण निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची मौल्यवान संधी आहे. मूल्य शिक्षण : मूलभूत तत्त्वे : प्रगत पदविका अभ्यासक्रमाकडे जाणारा ४-क्रेडिट सर्टिफिकेट कोर्स (ऑनलाइन), ग्लोबल सिटिझन बनणे – ऑनलाइन सर्टिफिकेट कोर्स. हे अभ्यासक्रम भारतभर किंवा कोणत्याही इच्छुक विद्यार्थ्याला शिकवले जाणार आहेत. 7. आरव एज्युकेशनल एम्प्लॉयमेंट रिसर्च ऑर्गनायझेशन नवी दिल्ली – यांच्यामार्फत विविध पदविका, अॅडव्हान्स डिप्लोमा आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम विकसित करून शेतकरी, ग्रामीण आणि आदिवासी समुदायांसह विविध विद्यार्थ्यांच्या गटासाठी अनेक शैक्षणिक आणि विस्तार कार्यक्रमांची आखणी जसे की: डिप्लोमा इन फायर टेक्नॉलॉजी अँड इंडस्ट्रियल सेफ्टी ऑपरेशन्स , डिप्लोमा इन हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर, औद्योगिक सुरक्षेतील अँडव्हान्स डिप्लोमा, डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी मॅनेजमेंट आणि इतर विविध शिक्षणक्रम 8. डिस्कव्हर वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड-  पोषण आणि आहारशास्त्र, आरोग्य आणि निरोगीपणाशी संबंधित अभ्यासक्रम राबविणे.

Advertisement

यावेळी कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी सामंजस्य कराराबाबत राष्टीय शैक्षणिक धोरण, रोजगाराभिमुख पदवी आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध संधी उपलब्ध होणार असून, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होणार आहे. राष्ट्र निर्माणासाठीच्या मनुष्यबळाची निर्मिती या हेतूने सदर करार करण्यात आले आहेत. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, आरोग्य विद्याशाखेचे संचालक डॉ. जयदीप निकम यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंतर्गत गुणवत्ता आश्वासन केंद्राचे संचालक डॉ. राम ठाकर यांनी केले, सुत्रसंचालन श्रीमती रामेश्वरी पवार यांनी केले तर आभारप्रदर्शन रियाज पिरजादे यांनी केले. याप्रसंगी कुलसचिव डॉ. दिलीप भरड, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेचे संचालक, जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे, तसेच वरील विविध संस्थांचे अधिकारी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page