डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व ’सीआयआय’ समवेत सामंजस्य करार

’इंडस्ट्री-युनिर्व्हसिटी’ सहकार्यातून व्यवस्थापनाचे धडे

’एमबीए’च्या विद्यार्थ्यांना लाभ होणार

छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व उद्योग क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील मान्यवर संस्था ’कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’ (सीआयआय) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. उद्योग क्षेत्र व शैक्षणिक क्षेत्राच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाचे धडे दिले जाणार आहेत.

कुलगुरु डॉ विजय फुलारी यांनी यांनी पदभार घेतल्यानंतर महिन्याभरातच मराठवाडयातील उद्योजकांसमवेत बैठक घेऊन दोन्ही क्षेत्राने सोबत काम करण्याची भुमिका मांडली. यास उद्योगक्षेत्राने सकारात्मक भूमिका घेतली. आजपर्यंत सात करार झाले आहेत. याच अनुषंगाने व्यवस्थापनशास्त्र विभगाच्या पुढाकाराने (सीआयआय) समवेत सामजंस्य करार (Memorandum of Understanding करण्यात आला.

Advertisement

प्र-कुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि १५) सायंकाळी व्यवस्थापन परिषद कक्षात ही बैठक झाली. यावेळी कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, व्यवस्थापनशास्त्र विभागाचे संचालक डॉ फारुख खान तसेच डीडीयुकेकेचे डॉ कुणाल दत्ता यांच्यासह व्यवस्थापनशास्त्र विभागातील प्राध्यापक उपस्थित होते. तर सीआयआय स्थानिक अध्यक्ष सुनील किर्दक, माजी अध्यक्ष मुकूंद कुलकर्णी, माजी अध्यक्ष समित सचदेव, रुबीना अबरार, संकेत चव्हाण आदींची उपस्थिती होती.

या करारांतर्गत प्रमुख तीन उद्दिष्टये ठेवण्यात आली आहेत. यामध्ये एक्झ्युकिटिव्ह एमबीए (एम्बेडेड) या अभ्यासक्रमास मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात येईल. तसेच ’इंडस्ट्री-युनिर्व्हसिटी’ यांच्यात शिक्षण/प्रशिक्षण, थेअरी व प्रॅक्टीकल यासाठी सहकार्य करणे तसेच मराठवाडयाच्या आर्थिक व सर्वांगीन विकासासाठी पूरक कुशल मनुष्यबळ निर्माण करणे याबाबत समावेश आहे. हा दोन्ही संस्थांच्या वाटचालीतील हा करार एक महत्वाचा टप्पा ठरेल, असे माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी म्हणाले.

यावेळी सुनील किर्दक म्हणाले, मराठवाड्यातील उद्योग क्षेत्र व शिक्षण क्षेत्राच्या पुढाकारातून कौशल्याभिमुख रोजगार व उपयोजित शिक्षण दिले येईल. तर सीआयआय या राष्ट्रीय संस्थेसोबत करार ’इंडस्ट्री_ युनिर्व्हसिटी’ यांच्यातील समन्वयाच्या दिशेने पाऊल पडले आहे, असे कुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे म्हणाले.

एमबीए प्रवेशास मुदतवाढ

दरम्यान, व्यवस्थापन शास्त्र विभागात ’एक्झ्युकिटिव्ह’ एमबीए (एम्बेडेड) या अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया सुरु आहे. हा संपूर्ण कोर्स ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. यासाठी प्रवेशासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती विभागाचे संचालक डॉ.फारुक खान यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page