महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम यांचा सामंजस्य करार
आरोग्य विद्यापीठात होणार इक्षणा वस्तुसंग्रहालय
नाशिक/कोलकाता : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिसरात सर्व उपचार पध्दतींचा समावेश असलेल्या ’इक्षणा’ म्युझियमची उभारणी बाबतचा परस्पर सामंजस्य करार केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाच्या विभाग असलेल्या नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम समवेत संपन्न झाला. दुरस्थ प्रणालीव्दारे एन.सी.एस.एम. चे महासंचालक ए डी चौधरी व आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्यात संपन्न झाला. याप्रसंगी बोलतांना क्षेत्रातील माहिती समाजातील जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी म्युझियमची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प. यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मुख्यालयात सुरु करण्यात येणारे ’इक्षणा’ म्युझियमचे अंतर्गत विकसनासाठी कोलकाता येथील नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम यांच्या समवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. सामंजस्य कराराचे आदान-प्रदान दुरस्थ पध्दतीने आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), एन.सी.एस.एम. चे महासंचालक ए.डी. चौधरी, उपसंचालक समरेंद्र कुमार, संचालक प्रमोद ग्रोवर, सचिव सुब्रोत कुमार मिश्रा, क्युरेटर मानस बागची, समवेत प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, वित्त व लेखाधिकारी एन.व्ही. कळसकर, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, डॉ. वाय. प्रविण कुमार, डॉ. मृणाल पाटील, अॅड. संदीप कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, आरोग्य क्षेत्रातील विविध विद्याशाखांचा इतिहास, वर्तमान आणि भविष्याचा वेध याची माहिती सर्वांना व्हावी यासाठी म्युझियम महत्वपूर्ण आहे. डिजिटल व टेक्नोसॅव्ही प्रकारात मांडणी करुन विद्यापीठातील म्युझियम अधिक सुसज्ज करण्यात येत आहे. आगामी कंुभमेळयाकरीता देशभरातून येणारे लोकांना आरोग्य विषयक जनजागृती व्हावी यासाठी हे म्युझियम उपयुक्त ठरु शकेल असे त्यांनी सांगितले. कोलकाता येथील नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम यांच्या सहकार्याने म्युझियमला वेगळे रुप मिळणार आहे. आरोग्य क्षेत्रातील जनसामान्यांना सोप्या पध्दतीने माहिती देणारा इक्षणा म्युझियम हा जगातील विशेष प्रकल्प ठरेल असे त्यांनी सांगितले.
नॅशनल कौन्सील ऑफ सायन्स म्युझियमचे डायरेक्टर जनरल श्री. ए.डी. चौधरी यांनी सांगितले की, आरोग्य क्षेत्रातील ’इक्षणा’ म्युझियम हा अनोखा प्रकल्प विद्यापीठासमवेत करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. या करीता योग्य पध्दतीने मांडणी व रचना करण्यात येईल. सामंजस्य करारात नमुद केलेल्या वेळेत प्रकल्प पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशभरात संस्थेतर्फे 36 विविध प्रकल्पांवर काम सुरु असून ’इक्षणा’चा हा प्रकल्प आगळा-वेगळा ठरणारा आहे असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, ’इक्षणा’ म्युझियमचा सामंजस्य करार ही पहिली पायरी असून कामाची सुरवात लवकरच हा प्रकल्प दिमाखदार पध्दतीने सुरु होईल असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, इंटिग्रेटेड नॉलेज ऑफ सस्टेनेबल हेल्थ या प्रमुख संकल्पनेवर आधारित या म्युझियमची संरचना असल्याचे त्यांनी सांगितले.
’इक्षणा’ म्युझियमच्या कन्सल्टंट डॉ. निलिमा कंदबी यांनी म्युझियमच्या एकूणच संकल्पनेबद्दल माहिती दिली.
डॉ. पराग संचेती यांनी या म्युझियमच्या उभारणीसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ’इक्षणा’ म्युझियमसाठी कार्पोरेट सोशल रिस्पोसिबिलिटी अंतर्गत निधी उभारण्यासाठी कार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे, श्री. सत्यजित सिंग यांनी केले. याप्रसंगी डॉ. विठ्ठल धडके, डॉ. विभा हेगडे, डॉ. पराग संचेती, डॉ. दत्ता नाडकर्णी, डॉ. मनिषा कोठेकर आदी मान्यवर दुरस्थ पध्दतीने उपस्थित होते. विद्यापीठातील अधिकारी डॉ. सुनिल फुगारे, डॉ. आर.टी. आहेर, श्री. महेंद्र कोठावदे, डॉ. वरुण माथूर, श्री. एच.बी. खैरनार,, श्री. देवेंद्र पाटील, श्री. महेश बिरारीस, श्री. हेमंत भावसार, श्री. दिप्तेश केदारे आदी अधिकारी उपस्थित होते.