महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि थ्री-डी ग्राफी कंपनी यांच्यात सामंजस्य करार
नाशिक : आरोग्य शिक्षणातील विद्यार्थ्यांना संशोधन, प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाकरीता तंत्रज्ञानाचा मोठया प्रमाणात वापर होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि थ्री-डी ग्राफी कंपनी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या कार्यक्रमास व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या कुलगुरु जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) समवेत प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ, सोशल अल्फाचे संस्थापक मनोज कुमार, थ्री-डी ग्राफीचे सी ई ओ डॉ शिबू जॉन, सी कॅॅम्पचे प्रोग्राम डायरेक्टर डॉ रवि नायर, थ्री-डी ग्राफीचे सी ओ ओ रिना शिबू, सोशल अल्फाचे डॉ चारुता मांडके, डॉ म्रिगांक वॉरिर, डॉ क्षमा कोठारी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, अरोग्य शिक्षणात संशोधन व नवकल्पना यांना चालना देणे गरजेचे आहे. याकरीता आरोग्य शिक्षणात थ्री-डी तंत्रज्ञान सोल्यूशन्सद्वारे थ्री-डी प्रिंटिंग आणि थ्री-डी उपकरणांसह लॅब स्थापन करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण, कौशल्य विकास व संशोधन आदी उपक्रमांना प्राधान्य देण्यात येत आहे. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून विद्यापीठाचे ‘दिशा’ आणि ‘दृष्टी’ कक्षामार्फत इनोव्हेशन व इन्कुबेशन संदर्भात मोठया प्रमाणात काम करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूसह प्रशिक्षण मॉड्यूल्स तयार करणे आणि नियमित अंतराने प्रशिक्षण घेणे याकरीता थ्री-डी ग्राफिक्स समवेत परस्पर सामंजस्य करार करण्यात येत आहे. हा सामंजस्य करार थ्री-डी डिझाइन तज्ञ, स्टार्टअप्स, डॉक्टर, उद्योजकांना प्रोत्साहित करून उद्योजकता वाढवण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. याव्दारा डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन विविध पध्दती शोधण्यात याव्यात जेणेकरुन आरोग्य विषयक समस्यांचे त्वरेने निराकरण करणे अधिक सुलभ होईल असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे प्रति-कुलुगुरु डॉ मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देणे तसेच आरोग्य शिक्षणात थ्री-डी तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षण पध्दतीत अवलंब करण्यात येईल. यासाठी नाविन्यपूर्ण थ्री-डी मुद्रित वैद्यकीय उपकरण उत्पादने सादर करण्यासाठी इनक्युबेशनमध्ये सामील होण्यासाठी अधिक हा सामंजस्य करार महत्वपूर्ण आहे. थ्री-डी तंत्रज्ञानाचा वापर करुन संशोधन करण्यासाठी मोठया प्रमाणात लाभ होईल, यासाठी विद्यापीठ सकारात्मकतेने प्रयत्नशील आहे. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवाद उत्तम होण्यासाठी संवाद कौशल्यावर भर देण्यात येत आहे. या सामंजस्य करारातून गरज व मागणी यांच्यात समतोल राखणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने कार्य करावे असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यापीठासमवेत करण्यात आलेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून या सामंजस्य कराराच्या माध्यमातून आरोग्य शिक्षणातील विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी थ्री-डी तंत्रज्ञान प्रशिक्षणसाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. याकरीता नियमित अंतराने प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात येईल याव्दारा थ्री-डी प्रिंटिंग आणि थ्री-डी उपकरणांसह लॅब स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
सोशल अल्फाचे संस्थापक मनोज कुमार यांनी सांगितले की, विज्ञान आणि नवकल्पना यांचा सर्वसमावेशक बाबींना चालना देण्यासाठी हा सामंजस्य करार महत्वपूर्ण आहे. याव्दारा शासकीय आणि खाजगी प्रयोगशाळेच्या उपक्रमांना समर्थन देण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यात येईल. थ्री-डी लॅबमध्ये नोंदणीकृत सर्व थ्री-डी तंत्रज्ञान कंपन्या, संशोधक, शास्त्रज्ञ, डॉक्अरांचे नेटवर्कच्या माध्यमातून मूल्यांकन करण्यात येईल. थ्री-डी प्रिंटर आणि थ्री-डी सॉफ्टवेअरमध्ये ग्राफिक प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. संशोधनाच्या अनुषंगाने आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. विद्यापीठाचे विविध संशोधन प्रकल्प, सेंटर ऑफ एक्सलन्स व स्टार्टअपसाठी शासनमान्या संस्थाच्या मदतीने आरोग्य शिक्षणात उल्लेखनीय काम करण्यासाठी थ्री-डी ग्राफि तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी थ्री-डी ग्राफीचे सीईओ डॉ शिबू जॉन, सी कॅॅम्पचे प्रोग्राम डायरेक्टर डॉ रवि नायर, थ्री-डी ग्राफीचे सीओओ रिना शिबू, सोशल अल्फाचे डॉ चारुता मांडके, डॉ म्रिगांक वॉरिर, डॉ क्षमा कोठारी यांनी मनोगत व्यक्त केली.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ व सोशल अल्फाचे संस्थापक मनोज कुमार यांनी परस्पर सामंजस्य करारपत्राचे आदान-प्रदान केले. या सामंजस्य कराराबाबतची कार्यवाही डॉ सुनिल फुगारे आणि विधी अधिकारी ॲड संदीप कुलकर्णी यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैक्षणिक अधिष्ठाता डॉ मृणाल पाटील यांनी केले. याप्रसंगी डॉ सुबोध मुळगंद व सायना भालेराव यांनी सादरीकरणातून विद्यापीठ प्रकल्पांची माहिती दिली. याप्रसंगी प्रमुख विशेष कार्य वित्त व लेखाधिकारी एन व्ही कळसकर, डॉ सुनिल फुगारे, अधिकारी डॉ सुबोध मुळगुंद, कर्नल वरुण माथूर, विधी अधिकारी ॲड संदीप कुलर्णी, महेंद्र कोठावदे, डॉ नितीन कावेडे, डॉ स्वप्नील तोरणे उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ प्रदीप आवळे, राजेंद्र शहाणे, डॉ प्रशांत शिवगुंडे, प्रशांत शिंदे, प्रविण जगताप दिप्तेश केदारे, रोहित भोये यांनी परिश्रम घेतले.