उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि अप थिंक एज्युटेक सर्व्हीस प्रा लि यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि अप थिंक एज्युटेक सर्व्हीस प्रा लि यांच्यातील शैक्षणिक सामंजस्य करारावर मंगळवार दि १२ मार्च रोजी कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या इंटर्नशीपला महत्व देण्यात आले आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना एज्युटेक प्रा लि ही कंपनी पदवी व पदवीपूर्व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तसेच संशोधनासाठी मार्गदर्शन व सहकार्य करते. या सामंजस्य करारान्वये विद्यार्थ्यांना औद्योगिक जगताची ओळख होईल. व्यावसायिक करीअरसाठी आवश़्यक असणारे कौशल्य विद्यार्थ्यांना दिले जातील. विद्यार्थ्यांना संशोधन व नोकरी विषयक संधी प्राप्त होणार आहे.
या सामंजस्य करार प्रसंगी कुलसचिव डॉ विनोद पाटील, संचालक डॉ राजेश जवळेकर, गणितशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा एस आर चौधरी, प्रा एच आर तिडके, प्रा रमेश सरदार, अप थिंक एज्युकेट प्रा लि चे मॅनेजर तेजस जगताप, तुषार जंगले, सुरेखा मोरे, वर्षा पहुजा, ऋषीकेश कुलकर्णी हे उपस्थित होते.