डॉ बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मोईन शाकीर स्मृती व्याख्यानमाला संपन्न
खेड्याचे समाजशास्त्र समजून घेण्याची गरज – ज्येष्ठ साहित्यिक डॉ राजन गवस
छत्रपती संभाजीनगर : खेड्याविषयी बोलले जाते पंरतु अभ्यास केला जाता नाही, गावगाड्यातील ज्ञान समजून घेण्यासाठी खेड्याचे समाजशास्त्र समजून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी केले. डॉ बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात मोईन शाकीर स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. या मध्ये प्रसिद्ध साहित्यिक राजन गवस यांनी गावगाड्यातील संदर्भ’ याविषयी विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, विभागप्रमुख डॉ. शुजा शाकीर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. गवस पुढे म्हणाले की, हे रसायन आहे हे आपण लक्षात घेतले नाही. हा समूह अडाणी आहे, अक्षर ज्ञानी नाही असे आम्ही समजतो. खेड्यांचा एका ज्ञान परंपरेकडे पाठ फिरवली आहे. यामधे भाषेतील अनेक शब्द लोप पावत आहेत. सिजरीयन आता सामान्य झाले आहे. निसर फुगडी, काटवातीतील भाकर थापणे, घागर घुमे दे हे बाळंतपणाची नैसर्गिक पद्धती होती. आता आधुनिक ज्ञान पद्धती स्वीकारल्या मुळे दुसऱ्याच्या हवाली केले आहे.खेड्यांच्या प्रकल्पात मोठी रक्कम खर्च झाली पण खेडे तपासले नाही. खेडे जातींनी बनत नसून समाजाने बनते. समाजाच्या पोटात जात असते. समाजाच्या पोटातच जातीची उतरंड असते, ते एक दुसऱ्यांना कमी लेखतो. जाती जातीत वैर हेवेदेवे हे तीव्र आहेत. या प्रत्येक समाजाचे जगणं सारखे नाही. रूढी, परंपरा यांच्यात अंतर आहे. समाजाचे हे पुंजके आहेत. समाजात गोतावळा आहे त्यांचे पदर जुळत नाहीत.
म्हणी व वाक्प्रचार, कीर्तन,वग,गवळण मनोरंजनशिवाय ज्ञान संक्रमणाचे मध्यम होते. ही ज्ञान,संक्रमण व मूल्य व्यवस्था होती. सहानुभव व समुहभाव खेड्यातील व्यवस्था होती. शहरामध्ये सहानुभाव गेला. खेड्यात खुलेपणा आहे. ते त्यांच्या जगण्याल्या बळ देत होता. खेड्यांची विस्वस्ताची कल्पना महत्वाची आहे. म. गांधीजीनी विस्वस्त व असहकार हे तत्त्व खेड्यानी दिले. धर्माने वाग ,पाचामुखी परमेश्र्वर खेड्यातील दैवतशास्त्र याचा अभ्यास केला पाहिजे. महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीचा अभ्यास केला पाहिजे ती प्रदेशानुसार भिन्न भिन्न आहे. खेड्यांचे अर्थकारण सुद्धा होते. पशुधनाची व्यवस्था होती. खेड्यात स्वतंत्र शिक्षण व्यवस्था होती. कुंभाराचे मुल काय शिकायचे. विणकाम कला,वारली , संगीत वाद्य, चार्मवाद्य या कला महत्वपर्ण होत्या. यावढ्या कालावधीत देखील आपण शिक्षण व्यवस्था विकसित करू शकलो नाही.असे गवस यांनी मत नोंदवले.
अध्यक्षीय समारोप कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी केला. ते म्हणाले की, मोईन शाकीर यांच्या नावाने ही व्याख्यानमाला चालविली जाते. ती व्यक्ती फार मोठी होती. त्यांचे योगदान मोठे होते. मोईन शाकीर यांनी आपल्या धर्मातील वाईट प्रथा, परंपरावर टीका केली. जुने खेळ संपत चालले आहेत. खेडे अर्ध शहरी झाले आहेत. शहरातील अपार्टमेंटमुळे लोक अपार्ट झाले आहेत. गवागड्यातल्या संस्कृतीचे आपण चिंतन करावे.गावातील जातीय, वर्गीय अभ्यास करावा. शोषित वंचितांचा अभ्यास करणे ही परंपरा विद्यापीठाने जपली आहे. सूत्रसंचलन डॉ. सत्यपाल कांबळे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. सविता नागे यांनी केले. मोईन शाकीर यांचा जीवनपट थोडक्यात खंडेराव काळे यांनी उलगडला, व्याख्यातांचा परिचय प्रा. लक्ष्मीकांत कुरंगळ यांनी करून दिला तर आभार डॉ. गणेश बनसोडे यांनी मानले. तर विभाग प्रमुख डॉ. शुजा शाकीर यांनी ही व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.