यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात मोडी लिपी कार्यशाळा संपन्न

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील मानव्याविद्या व सामाजिकशास्र विद्याशाखा आणि महाराष्ट्र शासनाचे पुरभिलेख संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ रोजी, ‘मोडी लिपी प्रचार व प्रसार’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारत येथील ऑडिटोरियममध्ये सकाळी 10 ते सायं. 5 दरम्यान कार्यशाळा संपन्न झाली. मानव्यविद्या व सामाजिकशास्र विद्याशाखेचे संचालक प्रा. नागार्जुन वाडेकर यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. विषयतज्ज्ञ मनोज राजपूत (पुरभिलेखाधिकारी) यांनी भूमिका कथन केली. पहिल्या सत्रात अमोल महल्ले (संशोधक सहाय्यक) यांनी मोडी लिपी बाराखडी आणि रेघीय पद्धती याचे प्रशिक्षण दिले.

Advertisement

दुसऱ्या सत्रामध्ये पंकज पाटील (वरिष्ठ डागडुजीकर) यांनी मोडी लिपीतील संक्षिप्त शब्द व त्याच्या व्याख्या याची सविस्तर माहिती दिली. गणेश खोडके (अभिलेखाधिकारी, कोल्हापूर अभिलेखागार) यांनी विविध कालगणना, महाराष्ट्रातील शासकीय व अशासकीय दफ्तरखाणे याची माहिती दिली तसेच कागदपत्रांचा कालखंड कसा ओळखावा याची माहिती दिली. नाशिक शहरातून जवळपास १०० हून अधिक विद्यार्थी/अभ्यासक/जिज्ञासू तसेच विद्यापीठातील कर्मचारी यांनी कार्यशाळेत सहभाग घेतला. याप्रसंगी कार्यशाळेतील सहभागींना ‘मोडी लिपी प्रचार व प्रसार’ ही पुस्तिका देण्यात आली. पुराभिलेख संचालनायल मुंबई येथून रोहित खोले आणि नरेश जोशी हे सुद्धा उपस्थित होते. डॉ. संजय खरात यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. नागार्जुन वाडेकर यांनी आभार मानले. सदर कार्यशाळेस कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन आणि कुलसचिव दिलीप भरड यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page