उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मोबाईल सायन्स व्हॅनचे मुक्ताईनगर येथे प्रदर्शन
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या माध्यमातुन मुक्ताईनगर येथील जगजीवनदास इग्रंजी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांना मोबाईल सायन्स व्हॅन दाखविण्यात आली.
समन्वयक डॉ. एस. एस. घोष यांच्या समन्वयाने प्रा. अमरदीप पाटील, विद्यापीठातील विद्यार्थी आकांक्षा महाजन, गौरी पाटील, अस्मिता पाटील, करनसिंग राजपुत यानी या मोबाईल सायन्स व्हॅन मधील २९ विज्ञान प्रयोगांची माहिती ४०० विद्यार्थ्यांना दिली. याशिवाय कुऱ्हाकाकोडा, ता. मुक्ताईनगर येथील लक्ष्मी नारायण आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना देखील हे विज्ञान प्रयोग दाखविण्यात आहे.