शिवाजी विद्यापीठाच्या युवा संसदेच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पारितोषिक स्विकारण्यासाठी संसदीय कार्य मंत्रालयाचे निमंत्रण

कोल्हापूर : संसदिय कार्य मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने नुकतेच शिवाजी विद्यापीठाच्या युवा संसदेचे समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांना 16 व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमासाठी दि. 16 फेब्रुवारी, 2024 रोजी नवी दिल्ली येथे उपस्थित राहण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. शिवाजी विद्यापीठातील 55 विद्यार्थ्यांच्या संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ही स्पर्धा 23 मे  2023 रोजी पार पडली. या स्पर्धेत प्रश्न तास, विशेषाधिकाराचा भंग, कॉलिंग अटेंशन मोशन, वैधानिक कामकाज, विधेयक सादर करणे इ. संसदीय कार्यप्रणालीतील विषयामध्ये स्वच्छ भारत, कृषी, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्ष्मीकरण, नवीन शैक्षणिक धोरण, आर्थिक धोरण, संरक्षण इ. संदर्भाने युवा संसदेमध्ये अभ्यासपूर्ण चर्चा झाली.

Advertisement
Invitation from the Ministry of Parliamentary Affairs to accept the award for outstanding performance of Youth Parliament of Shivaji University

दिनांक16फेब्रुवारी, 2024 रोजी संसदिय कार्यमंत्रालयाचे राज्यमंत्री अर्जुनलाल मेघवाल यांच्या अध्येक्षतेखाली 16 व्या राष्ट्रीय युवा संसदेच्या बक्षिस वितरणाचा कार्यक्रमसंसदेच्या आवारातील बालयोगी सभागृहामध्ये होणार आहे. यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या युवा संसदेच्या संघाचा समुहस्तरावर पहिला नंबर आल्याबद्दल चषक मिळणार आहे. तसेच युवा संसदेचे समन्वयक डॉ. प्रल्हाद माने आणि आठ बक्षिस प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिकाने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामध्ये अनमोल पाटील, आसिया जमादर, श्रेया म्हापसेकर,पवन पाटील, साई सिमरन घाशी, प्रतीक्षा पाटील, रुतिका धनगर, प्रतिक्षा कांबळे या विद्यार्थ्यांचा समावेशआहे.

याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. डी. टी शिर्के, प्र-कुलगुरु प्रा. डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे आणि संचालक डॉ. पी. टी. गायकवाड यांनी युवा संसदेचे अभिनंदन केले. संसदिय कार्य मंत्रालयामार्फत प्रत्येक वर्षी संपूर्ण देशात महाविद्यालयमध्ये आणि विद्यापीठामध्ये या स्पर्धेचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची मुल्ये रूजावीत, शिस्त निर्माण व्हावी, इतरांच्या मताचा आदर करता यावा,  सहिष्णुता निर्माण व्हावी, भविष्यामध्ये चांगले नेतृत्व निर्माण व्हावे आणि विद्यार्थी समुदायाला संसदेच्या कार्यपद्धती जाणून घेता याव्यात यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. शिवाजी विद्यापीठाने गेल्या पाच वर्षामध्ये या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमठवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page