एमएसएमई मंत्रालयाचा देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या महिला इन्क्युबेटीला ₹१५ लाख अनुदान मंजूर

छत्रपती संभाजीनगर : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MSME), भारत सरकारने देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या महिला इन्क्युबेटीला त्यांच्या इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन कार्यक्रमांतर्गत ₹१५ लाख अनुदान मंजूर केले आहे. हे अनुदान महाविद्यालयाच्या इन्क्युबेशन सेंटरमधून उभरत्या स्टार्टअप्सच्या प्रगतीसाठी मदत करण्याच्या उद्देशाने प्रदान केले गेले आहे, ज्यामुळे त्यांना अधिक क्षमता आणि संसाधनांची उपलब्धता होईल. MSME आयडिया हॅकाथॉन साठी देशभरातून एकूण १८,८८८ कल्पना सादर झाल्या, ज्यात ६८० कल्पनांची निवड करण्यात आली आणि त्यापैकी ३९७ कल्पनांना निधी मिळवण्यासाठी मंजुरी दिली गेली. देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाला या हॅकाथॉनमध्ये ११ कल्पना प्राप्त झाल्या, त्यापैकी ७ कल्पनांना सादरीकरणासाठी निवडले गेले, आणि २ कल्पनांना निधी मिळवण्यासाठी शिफारस करण्यात आली. यातील एक कल्पना, ‘एअर कुलरमधील वॉटर पंप नियंत्रित करून वीज आणि पाणी वापर कमी करण्यासाठी’ संबंधित, ₹१५ लाख अनुदान मिळवण्यात यशस्वी ठरली.

Advertisement
DIEMS Deogiri College
?

देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाने नेहमीच नवोन्मेष आणि उद्यमशीलतेला प्रोत्साहन दिले आहे. महाविद्यालयाच्या इन्क्युबेशन सेंटरने युवा उद्योजकांना त्यांच्या कल्पनांना व्यवसायात रूपांतरित करण्यासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध केले आहे. MSME कडून मिळालेल्या या अनुदानामुळे महाविद्यालयाच्या इन्क्युबेशन सेंटरला अधिक मान्यता मिळाली आहे आणि यामुळे स्टार्टअप इकोसिस्टमला बळ मिळालं आहे.

महाविद्यालयाच्या प्रभारी संचालक डॉ. सुभाष लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली, इन्क्युबेटींना योग्य संसाधने, कौशल्यवर्धन, आणि व्यवसायाची योग्य दिशा मिळत आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या स्टार्टअप्समध्ये यश मिळवण्यासाठी मदत होणार आहे. डॉ. सचिन अग्रवाल यांनी विशेष परिश्रम घेतले आणि MSME iDEA हॅकथॉन संबंधित स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाने MSME आयडिया हॅकाथॉन कार्यक्रम यशस्वीरीत्या आयोजित करण्याबद्दल, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष मा. आ. श्री. प्रकाशदादा सोळुंके, सचिव मा. आ. श्री. सतीश चव्हाण, उपाध्यक्ष श्री. शेख सलीम शेख अहमद, कोषाध्यक्ष श्री. किरण आवरगावकर, कार्यकारीणी सदस्य श्री. विश्वास येळीकर, श्री. प्रदीप चव्हाण, महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉ. सुभाष लहाने, विभागप्रमुख डॉ. सत्यवान धोंडगे, डॉ. गजेंद्र गंधे, डॉ. सचिन बोरसे, डॉ. सुगंधा असोदेकर, डॉ. आरती वाढेकर, डॉ. शोएब शेख, डॉ. रुपेश रेब्बा, प्रा. संजय कल्याणकर, श्री. अच्युत भोसले, डॉ. राजेश औटी यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page