एमजीएमच्या प्रा. शिव कदम यांना पीएचडी प्रदान

छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन (एमजीएम) विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फिल्म आर्ट्सचे विभागप्रमुख प्रा. शिव कदम यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे.

प्रा. कदम यांनी “लिटरेचर, अडॉप्शन अँड फिल्म्स : दि इवोल्युशन ऑफ नरेटिव्ह टेक्निक्स इन मेकिंग ऑफ शेक्सपियर्स रोमिओ अँड ज्युलिएट” या विषयावर एमजीएम विद्यापीठातून डॉ. रश्मी आचमरे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले.

Advertisement

त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, परीक्षा नियंत्रक डॉ. एच.एच. शिंदे तसेच इतर प्राध्यापक व सहकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *