एमजीएम विद्यापीठाचा तिसरा दीक्षांत समारंभ उद्या
छत्रपती संभाजीनगर : येथील एमजीएम विद्यापीठाचा तिसरा दीक्षांत समारंभ ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात होणार आहे. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून दीक्षांत भाषण करतील. समारंभात विद्यापीठाच्या १२८४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये ७६२ पदवी, ३९९ पदव्युत्तर पदवी, ८३ पदविका, २७ पदव्युत्तर पदविका, ३ विद्यावाचस्पती (पीएच.डी.) आणि ४ प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना डी.लिट पदवी प्रदान करून सन्मानित केले जाणार आहे.
समारंभात १० विद्यार्थ्यांना कुलपती सुवर्ण पदक तर स्थापत्य अभियांत्रिकीतील एका विद्यार्थ्याला प्राचार्य प्रताप बोराडे सुवर्ण पदक दिले जाणार आहे.
समारंभात एमजीएम विद्यापीठाचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, कुलपती अंकुशराव कदम, आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
महात्मा गांधी मिशन विद्यापीठ हे २०१९ पासून कार्यरत असून मराठवाड्यातील पहिले खाजगी विद्यापीठ म्हणून ओळखले जाते