एमजीएम विद्यापीठचे अंकुश सोनुने नेट – सेट परीक्षा उत्तीर्ण
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या भारतीय आणि विदेशी भाषा संस्थेच्या मराठी विभागातील ‘लेखनकौशल्ये व मुद्रितशोधन’ अभ्यासक्रमाचे विद्यार्थी अंकुश माणिक सोनुने हे विद्यापीठ अनुदान आयोगाकडून माहे जून २०२३ मध्ये घेतलेल्या नेट परीक्षेमध्ये मराठी विषयात उत्तीर्ण झाले असून ते कनिष्ठ शोध शिष्यवृत्तीस (जेआरएफ) पात्र झाले आहेत.जेआरएफ शिष्यवृत्तीसाठी पात्र झाल्यामुळे सोनुने यांना पीएच.डी. करण्याकरिता प्रतिमहा ५० हजार रुपयांचे ५ वर्षे आर्थिक साहाय्य मिळणार आहे. गेल्याच महिन्यात ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या सेट परीक्षेतही उत्तीर्ण झाले आहेत.
या यशाबद्दल अंकुश सोनुने यांचे विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, सामाजिक शास्त्रे आणि मानव्यविद्या शाखेच्या अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, आयआयएफएलच्या संचालक डॉ. शैली अस्थाना, मराठीचे प्रा. डॉ. राम गायकवाड, प्रा. डॉ. मारुती गायकवाड आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.