एमजीएम विद्यापीठाने राष्ट्रीय स्पर्धेत पटकाविले पारितोषिक
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, स्कूल ऑफ लिगल स्टडीज अँड रिसर्चमध्ये बीबीए एल. एल. बी. च्या प्रथम वर्षात शिकणारा विद्यार्थी अब्दुल्ला मोतीवाला याने एमपी लॉ कॉलेज आयोजित नॅशनल पॉवर पॉइंट प्रझेन्टेशन स्पर्धेत द्वितीय पारितोषिक प्राप्त केले आहे. हे पारितोषिक मिळविल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी विद्यार्थी अब्दुल्ला मोतीवाला याने ‘डेटा डिल्यूज डिफेन्स : द बिग डेटा ब्रीच अँड डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल, २०२३’ या विषयावरील आपले प्रझेन्टेशन सादर केले होते. या स्पर्धेसाठी त्याला महाविद्यालयाच्या प्रा.रिना मानधनी यांनी मार्गदर्शन केले असून सादर केलेल्या प्रझेन्टेशनला स्पर्धेत द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. स्पर्धेत पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते अब्दुल्ला यास स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, स्कूल ऑफ लिगल स्टडीज अँड रिसर्चमध्ये बीबीए एल. एल. बी. च्या प्रथम वर्षात शिकणारा विद्यार्थी अब्दुल्ला मोतीवाला याने एका राष्ट्रीय स्पर्धेत पारितोषिक प्राप्त करणे ही विद्यापीठासाठी आनंददायक बाब आहे.
विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेणारे विद्यार्थी कायम विविध स्पर्धांमध्ये भाग घेत असतात. स्कूल ऑफ लिगल स्टडीजने अल्पावधीत आपले नावलौकिक कमावले असून येत्या काळामध्ये येथील विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव करतील, असा विश्वास कुलपती अंकुशराव कदम यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी अब्दुल्ला मोतीवाला याचे अभिनंदन करीत असताना कुलगुरू डॉ. विलास सपकाळ म्हणाले, एमजीएम विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असून विद्यार्थ्यांना कायम वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थी मिळालेल्या संधीचे सोने करीत संबंधित स्पर्धेत पारितोषिक मिळवितात, ही एमजीएमसाठी निश्चितपणे अभिमानाची बाब आहे. विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, संचालिका डॉ. झरताब अंसारी, प्रा. रिना मानधनी यांनी अब्दुल्ला याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.