एमजीएमच्या विद्यार्थ्यांनी वारीमध्ये सहभागी होत दिला स्वच्छतेचा संदेश

छत्रपती संभाजीनगर : वाळूज परिसरातील छोट्या पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे दरवर्षी आषाढी एकादशीला मोठी यात्रा भरते. यंदाच्या आषाढी एकादशीचे औचित्य साधून एमजीएम विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या १०० स्वयंसेवकांनी छोट्या पंढरपुरातील वारीमध्ये आपला सहभाग नोंदवत स्वच्छतादूत म्हणून काम केले. विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी यावेळी पर्यावरणपुरक संदेश देत हा परिसर स्वच्छ करण्याचे कामही केले.

Advertisement

दरवर्षी एमजीएम विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आपली सामाजिक बांधिलकी जपत वारीमध्ये आपले योगदान देत असतात. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देत जनजागृती करणे हा या सहभागामागील मुख्य उद्देश असतो. छोटे पंढरपूर परिसरात आजूबाजूच्या गावांतील व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शन व यात्रेसाठी येतात. त्याचप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त या ठिकाणी शेकडो दिंड्या येत असतात. विद्यार्थ्यांनी या उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी होत वारकऱ्यांशी संवादही साधला.

यावेळी, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा डॉ आर आर देशमुख, प्रा डॉ पी डी शिंदे, डॉ प्रविण शास्त्री, प्रा हृषीकेश काकडे, डॉ लुभना सय्यद, प्रा सुजाता राठोड ,प्रा डॉ आशा डागर व सर्व संबंधित उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page