एमजीएमच्या प्रणव गड्डमने राज्य अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत पटकाविले कांस्यपदक 

छत्रपती संभाजीनगर : एमजीएम शूटिंग अकॅडमीचा खेळाडू प्रणव गड्डम याने अहमदाबाद येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकाविले आहे. १० मीटर एयर पिस्टल या प्रकारात सब युथ मेन या गटात प्रणवणे हे कांस्यपदक जिंकले आहे. ही स्पर्धा शनिवार दिनांक २२ जून २०२४ ते रविवार, दिनांक ३० जून २०२४ दरम्यान गुजरात येथे पार पडली. या विजयाबद्दल प्रणवचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Advertisement

 प्रणवने राज्य अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक मिळविल्याबद्दल एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांनी त्याचे अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्याच्या या यशाबद्दल कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ रेखा शेळके, क्रीडा संचालक नितीन घोरपडे व प्रशिक्षिका गीता म्हस्के यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.

प्रणव हा मूळचा गुजरातचा असून तो सध्या एमजीएम शूटिंग अकॅडमी येथे नेमबाज व प्रशिक्षक गीता म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. प्रणव सध्या इयत्ता दहावीमध्ये शिकत असून तो नोव्हेंबर २०२४ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेची तयारी  करत आहे. सातत्याने केलेला सराव आणि योग्य मार्गदर्शन यामुळे हे पदक जिंकता आले, असे यावेळी बोलताना प्रणव गड्डम याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page