महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या विद्यार्थीकरीता नवीन बांधण्यात आलेल्या मेस ईमारतीचे ४ मे रोजी उदघाटन
छत्रपती संभाजीनगर : दिनांक ०४ मे २०२५ (रविवार) रोजी सकाळी १०:०० वाजता महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ परीसर, येथील विद्यापीठाच्या विद्यार्थीकरीता नवीन बांधण्यात आलेल्या मेस ईमारतीच्या उदघाटनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. सदरील कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख पाहूणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती के व्ही विस्वनाथन यांच्या हस्ते होणार असुन अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती आणि विद्यापीठाचे कुलपती न्यायमूर्ती अभय एस ओक व तसेच मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद येथील न्यायाधीश न्यायमूर्ती रविंद्र घुगे व न्यायमूर्ती मंगेश पाटील व इतर विद्यमान आणि माजी न्यायाधीश उपस्थितीत राहणार आहेत.

तसेच वर नमुद केलेल्या कार्यक्रमानंतर दिनांक ०४ मे २०२५ (रविवार) रोजी सकाळी १०:३० वाजता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती के व्ही विस्वनाथन यांचे “एकविसाव्या शतकातील विधी व्यवसायाची संकल्पना विधी विद्यापठांची भूमीका” या विषयावर विद्यापीठाच्या मुटकोर्ट हॉल मध्ये परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. सदरील काग्रक्रमास मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथील न्यायमूर्ती रविंद्र घुगे व न्यायमुर्ती मंगेश पाटील व इतर विद्यमान आणि माजी न्यायाधीश सुध्दा उपस्थितीत रहाणार आहेत.
विद्यापीठाचे कुलगुरु बिंदु एस रोनॉल्ड व कुलसचीव धनाजी एम जाधव यांनी सदरील वर नमुद केलेल्या कार्यक्रमास उपस्थितीत राहाण्याची विनंती केले आहे. असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात आले आहे.