विवेकानंद महाविद्यालयात बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
विद्यार्थ्यांनी गुणग्राहकता जोपासावी – अक्षय शिसोदे
छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थ्यांनी गुणग्राहकता जोपासून नवनवीन कौशल्ये आत्मसात करावीत. महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले घवघवीत यश पाहुन खर्या अर्थाने कै पंढरीनाथ पाटील यांचे स्वप्न साकार केले आहे “असे उद्गार विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अक्षय शिसोदे यांनी काढले. महाविद्यालयात बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे कोषाध्यक्ष तुषार शिसोदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दादाराव शेंगुळे, उपप्राचार्य पी ई पाटील, पर्यवेक्षक भारत सोनवणे यांची उपस्थिती होती.
एचएससी बोर्ड परीक्षा २०२४ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. बक्षीस वितरण पर्यवेक्षक गणेश दळे यांनी केले. यामध्ये कला शाखेमध्ये प्रथम आलेल्या सायली किशोर मिसाळ व अश्विनी गणेश गवई, व्दितीय – तनिषा महेश गारदे, तृतीय श्रावणी वीरेंद्र जुगदार तर वाणिज्य शाखेमध्ये प्रथम पायल शंकर शिंदे, दितीय-द्रोण तुकाराम जाधव, तृतीय पल्लवी गणेश फुलाने व ऋषिकेश पुंजाराम कोरडे या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे विज्ञान शाखेमध्ये प्रथम – वेदिका गणेश पिंपळे, दितीय – दिव्या बलवंत रावते व तृतीय चंचल अमित घुले या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.
तसेच नीट २०२४ मधील गुणवंत विद्यार्थी वाशिंबे वैभवी राजीव – 615, कुलकर्णी सायली मंगेश – 632, घनबहादूर साहिल विनय – 652, रावते दिव्या बलवंत – 646 पिंपळे वेदिका गणेश – 661 या विद्यार्थ्यांचाही गुणगौरव करण्यात आला. तसेच MH-CET 2024 मध्ये गुणवंत विद्यार्थी अथर्व केदार तांबे – 97.69, सायली मंगेश कुलकर्णी – 99.37, वेदिका गणेश पिंपळे – 99.77 या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच NDA मध्ये AIR-२ आलेला आदित्य गोरख बाविस्कर या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात आला. याप्रसंगी या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो दादाराव शेंगुळे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मनस्वी शुभेच्छा दिल्या व दरवर्षी अधिकाधिक गुणवंत विद्यार्थी घडतील यासाठी आपण कटीबध्द राहू, असा आशावाद व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ देविदास किरवले यांनी केले तर आभार डॉ योगेश कातबने यांनी मानले.