सौ के एस के महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
बीड : सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या मार्फत शैक्षणीक वर्ष 2024 मधील इयत्ता 12 वी च्या फेबुृवारी / मार्च मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा नवगण शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ दीपा क्षीरसागर यांच्या हस्ते संपन्न झाला.
महाविद्यालयातील इयत्ता बारावीचा तीनही शाखेचा एकूण सरासरी निकाल 97.90 टक्के इतका लागलेला आहे. त्यामध्ये विज्ञान शाखा 98.33, कला शाखा 94.64 , वाणिज्य शाखा 100 टक्के व व्यवसाय अभ्यासक्रम 66.66 टक्के इतका लागलेला आहे. विज्ञान शाखेत अंकिता फुलचंद हंगे, प्रथम, भाग्यश्री नानासाहेब कुदळे द्वितीय, श्रुती राजाभाऊ डावरे तृतीय तर वाणिज्य शाखेतून सानिका संजय शिंदे प्रथम, महेश लक्ष्मण मस्कर द्वितीय, आदित्य प्रकाश फटाले तृतीय, कला शाखेतून प्रियंका रविंद्र गंडले प्रथम, दिपक बाबासाहेब कांबळे द्वितीय, प्रियंका गौतम वाघमारे तृतीय तसेच नीट परिक्षेतून अनुष्का मुकेश अग्रवाल 658, ओमकार लक्ष्मण कांदे 657, श्रध्दा कल्याण घोडके,आर्यन शितल कोटेचा 624 तर 515 पर्यंत एकूण चौदा विद्यार्थ्यांनी गुण प्राप्त केले आहेत.
जेईई / एमएचटीसीईटी मधून सुरज उध्दव बादाडे 97.92, अविष्कार अंकुश चव्हाण 97.59 संस्कृत विषयात एकूण शंभर पैकी शंभर गुण घेणार्या चौदा विद्यार्थ्यांचा कोमल परमेश्वर शेटे, प्रतिक्षा दिपक गायकवाड, प्रशीक विठ्ठल गायकवाड, प्रचेत सुशांत साळूंके, श्रध्दा मुकूंद भालेराव, प्रिती पुरूषोत्तम भोसले, अनुजा अरूण जाधव, कार्तिकी नारायण चव्हाण, पूजा प्रकाश घोडके, अनुष्का विश्वास चव्हाण, सिध्दार्थ श्रीकिसन वाघमारे, ऋतुजा हनुमाने वंजारे, सुजाता आदिनाथ राऊत, उत्कषा राहूल गायकवाड, साक्षी विश्वनाथ गालफाडे, युवराज विष्णू गायकवाड आदींचा यावेळी या प्रसंगी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर, उपप्राचार्य डॉ नारायण काकडे, पदव्युत्तर संचालक डॉ सतीश माऊलगे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर, डॉ सुधाकर गुट्टे, कार्यालय अधिक्षक डॉ विश्वांभर देशमाने, विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.