महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात गुणवंत पाल्यांचा सत्कार

सामाजिक जडण-घडणीत विद्यार्थ्यांची भुमिका महत्वपूर्ण – कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर

नाशिक : सामाजिक जडण-जडणीत विद्यार्थ्यांची भुमिका महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) समवेत प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू, बोधीकिरण सोनकांबळे, डॉ देवेंद्र पाटील, डॉ नितीन कावेडे, एन व्ही कळसकर, ब्रिग सुबोध मुळगुंद यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

याप्रसंगी विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगीतले की, विद्यार्थी हा समाजातील महत्वाचा घटक आहे. उद्याचा उज्वल समाज घडणीत त्यांची भुमिका महत्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रोत्साहन द्यावे. शासनाच्या अनेक योजना याकरीता कार्यरत असून याकरीता मार्गदर्शनपर उपकम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांची बुध्दीमत्ता व विकास त्यांच्या सभोतालच्या वातावरणावर अलंबून असतो. शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे प्रोत्साहन त्यांना अधिक मोलाचे असते. विद्यार्थ्यांच्या इच्छेप्रमाणे पालकांनी हव्या त्या क्षेत्रात संधी उपलब्ध करुन द्यावी जेणेकरुन यशाचे सर्वोच्च शिखर गाठतील असे त्यांनी सांगितले.

Advertisement

शैक्षणिक वर्ष 2023-2024 वर्षात माध्यमिक शालांत परीक्षा, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा, पदवी, पदविका अभ्यासकम पदव्युत्तर पदवी, पदविका अभ्यासकम उत्तीर्ण झालेल्या तसेच विशेष प्राविण्य मिळालेल्या पाल्यांचा विद्यापीठातर्फे गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात प्रथम, व्दितीय व तृतीय कमांकाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरुपात धनादेश रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

माध्यमिक शालांत परीक्षेत प्राविण्यासह उत्तीर्ण पूर्वा सोनवणे, श्रीपाद सोनार, श्रेयश रामटेके, धैर्य राठोड, वेदांत धेंडे, रुतुजा जोशी, अमृता दौंड, मानस देशमुख, वेदांत पवार, दुर्वेश घोडके, पुष्कर वाघ, वैष्णवी साळवे, यश सांगळे, मिहिका निकुंभ, पियुष वाणी, अमेय शेंदुर्णीकर, अथर्व माळी, प्रथमेश जाधव, प्रथमेश शेजवळ, आदित्य आचार्य, शुभम कोचुरे यांचा गौरव करण्यात आला.

उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रथमेश शेलमोकर, सानिका महाजन, प्रथमेश शिंदे, अनन्या पवार, जयश्री परभणे, श्रुती सोमवंशी, स्वप्नील कोकाटे, यश सांगळे, गायत्री कापडणे, रिध्दी भावसार यांचा गौरव करण्यत आला.

पदवी परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केलेले ऋतुजा भुजबळ, राजश्री सोननीस, सोहम दळवी, अदिती देशपांडे, आर्या देशमानकर, यदुराज हिंगणे, अनुष्का पाटील शुभम मिसाळ, जानवी पाटील, कोमल सोळशे, प्रणित गुजांळ, आकाश भिसे यांचा तसेच पदव्युत्तर पदवी परीक्षेत उत्तीर्ण प्रथमेश पवार, पुनम चव्हाण, अक्षयासोनार, अमित पाटील, पवन शिंदे यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थांचा गौरव करण्यात आला यामध्ये कल्पेश सूर्यवंशी, श्रावणी पाटील यांना गौरविण्यात आले.

विद्यापीठाचा गुणवंत पाल्य गौरव कार्यक्रमाकरीता प्रविण सोनार, सुरेश शिंदे, राहूल विभांडिक, उज्वला पवार, नंदकिशोर वाघ, तुषार शिरुडे, नंदकिशोर दहिवतकर यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page