डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात डॉ फुलचंद सलामपुरे यांचा सेवागौरव
सामाजिक वीण टिकविण्यात शिक्षकांची भूमिका मोलाची – आमदार सतीश चव्हाण
छत्रपती संभाजीनगर : पुरोगामी महाराष्ट्राचे आजचे राजकारण दुर्दैवाने गढूळ झाले आहे. अशा वेळी राज्याची वीण विस्कटू नये म्हणून शिक्षण क्षेत्रातील मंडळींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार सतीश चव्हाण यांनी केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ फुलचंद भगीरथ सलामपुरे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीने य शनिवारी (दि १०) सेवापुर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. यानिमित्ताने लोकसंवाद फाउंडेशनच्यावतीने शनिवारी (दि १०) सायंकाळी विवेकानंद महाविद्यालयाच्या सभागृहात त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. आमदार सतीश चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, घाटीचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ शिवाजी मदन, डॉ कल्याण लघाने, डॉ दादाराव शेंगुळे, प्राचार्य डॉ भारत खंदारे, डॉ अंकुश कदम,माजी नगरसेवक गण पांडे, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ राजेश करपे, डॉ नरेंद्र काळे, डॉ स्मिता अवचार, वसंतीबाई सलामपुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार सतीश चव्हाण म्हणाले, मराठवाड्याच्या शिक्षकांनी नेहमीच पुरोगामी भूमिका घेऊन सामाजिक सलोखा कायम ठेवला आहे. डॉ फुलचंद सलामपुरे यांनी शिक्षण व क्रीडा क्षेत्रात दिलेले योगदान उल्लेखनीय आहे, असेही ते चव्हाण म्हणाले. मंचावरील सर्वच वक्त्यांनी आपल्या भाषणात डॉ सलामपूरे यांचा गौरव केला. शिक्षण क्षेत्रात यात चांगल्या मंडळींनी देखील राजकारणात येऊन यावे, असे आवाहन माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनीही केले. तर क्रीडा, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात आपल्याला सर्वांनीच दिलेली साथ यामुळेच या पदापर्यंत पोहोचू शकलो, असे आपले मनोगतात डॉ सलामपुरे म्हणाले. मित्रपक्ष हाच आपला पक्ष असल्याची ते म्हणाले. डॉ संध्या मोहिते यांनी मानपत्राचे वाचन केले.
संकेत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन तर डॉ. संदीप पाटील यांनी आभार मानले. फाउंडेशनचे सचिव डॉ गणेश मोहिते, डॉ राम चव्हाण डॉ दयानंद कांबळे, प्रा हरिदास सोमवंशी, सुदाम मुळे, डॉ मुंजाबा धोंडगे, डॉ संदीप पाटील, गोकुळ तांदळे आदींनी कार्यक्रमासाठी प्रयत्न केले.