महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘मेरी माटी मेरा देश’ संपन्न
‘अमृत कलश’ सामाजिक एकता व अखंडतेचे प्रतिक
– मा. कुलगुरु लेफ्ट. जनरल माधुरी कानिटकर यांचे प्रतिपादन
नाशिक : मेरी माटी मेरा देश उपक्रमातील ‘अमृत कलश’ सामाजिक एकता व अखंडतेचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमांतर्गत अमृत कलशात माती संकलीत करण्यात आली. या कार्यक्रमास विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प समवेत मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकरी श्री. एन.व्ही.कळसकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे आदी अधिकारी यांनी सहभाग घेतला. या प्रसंगी विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, ‘मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम उल्लेखनीय असून ‘अमृत कलश’ मध्ये विद्यापीठातील माती संकलीत करण्यात आली आहे, ही अभिमानाची बाब असून. पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या उपक्रमातंर्गत संकलीत माती ‘अमृत वाटिका’ तयार करण्यासाठी वापरात येणार आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे, शूरवीरांचे स्मरण यावेळी आपण स्मरण करुया. सामाजिक शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात क्रांती घडविण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून प्रण करुयात. पंचप्राण प्रतिज्ञेच्या माध्यमातून समाजात एकता व एकात्मता अखंड राहण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील रहावे असे त्यांनी संागितले.
विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, एक मूठ माती हा राष्ट्राच्या समर्पणासाठी तत्पर असल्याचा भाव आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कौशल्य विकास, शिक्षण क्षेत्रात संशोधनाला वाव आणि तंत्रज्ञानाचा वापर मोठया प्रमाणात वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे असलयाचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाचे मा. कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी संागितले की, अमृत कलशाच्या माध्यमातून मातृभूमीविषयीची कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. याकरीता विद्यापीठाच्या सर्व संलग्नित महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे असे त्यांनी संगितले. विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे यांनी सांगितले की, या उपक्रमात सहभागी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व संलग्नित सहभागी विद्यार्थी, शिक्षक यांनी सेल्फी काढून ‘मेरी माटी मेरा देश’ च्या पोर्टलवर अपलोड करणार असल्यचे त्यांनी सांगितले.
याप्रंसगी विद्यापीठात ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमांतर्गत पंचप्रण प्रतिज्ञा वाचून शपत घेण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनंसपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. कार्यक्राचे समन्वयन विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे यांनी केले. या उपक्रमासाठी श्री. बाळासाहेब पेंढारकर, श्री. राजेश इस्ते, श्री. अविनाश सोनवणे, श्रीमती स्मिता करवल, श्री. आबाजी शिंदे, श्री. राजू दिवे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.