महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व सन फार्मा इंडस्ट्रिज लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार

आरोग्य विद्यापीठातील ‘इक्षणा’ म्युझियमकरीता
सन फार्माच्या सी.एस.आर. मधून पाच कोटी निधी मिळणार

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील ’इक्षणा’ म्युझियमच्या उभारणी करीता सन फार्मा इंडिस्टीज लिमिटेड यांच्याकडून कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) मधुन रुपये पाच कोटी इतका निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याअनुषंगाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व सन फार्मा इंडिस्टीज लिमिटेड यांचा सामंजस्य कराराचे आदान-प्रदान कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, मा. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजकुमार पाटील, वित्त व लेखाधिकारी श्री. बी. जे. सोनकांबळे, ‘चक्र’ च्या सी.ई.ओ. डॉ. रंजना कुमार, सन फार्माचे उत्तर महाराष्ट्रातील रिजनल हेड श्री. रमेश येवला, कर्नल अजित पालेकर, अॅड. संदीप कुलकर्णी, एन.सी.एस.एम. चे कंन्सटंट श्री. मानस बागची, एन.सी.एस.एम. चे संचालक श्री. आर.एस. मुरली, ब्रिग. मुळगुंद, इक्षणा म्युझियमचे कोऑर्डिनेटर डॉ. स्वप्नील तोरणे, श्रीमती प्रिया कदम तसेच विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. पराग संचेती, इक्षणा म्युझियमचे कंसल्टंट डॉ.निलिमा कदंबी, सन फार्माचे सी.एस.आर. हेड श्री. चंद्रशेखर गौडा, असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट श्री. अभिजित भटकर दुरस्थ प्रणालीव्दारे उपस्थित होते.

’इक्षणा’ म्युझियमचे अंतर्गत विकसनासाठी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) मधुन करण्यात आलेले आर्थिक सहाय्य म्युझियमच्या उभारणीस गती मिळेल. डिजिटल व टेक्नोसॅव्ही प्रकारात मांडणी करुन विद्यापीठातील म्युझियम अधिक सुसज्ज करण्यात येत आहे. आगामी कंुभमेळयाकरीता देशभरातून येणारे लोकांना आरोग्य विषयक जनजागृती व्हावी यासाठी हे म्युझियम उपयुक्त ठरु शकेल.  सन फार्मा इंडस्ट्रिज लिमिटेडने केलेल्या सहकार्याने इक्षणा म्युझियमच्या कामे अधिक वेगवान पध्दतीने होतील आणि लवकरच आरोग्य क्षेत्रातील जनसामान्यांना सोप्या पध्दतीने माहिती देणारा इक्षणा म्युझियम हा विशेष प्रकल्प सुरु होईल - कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर(निवृत्त)
Memorandum of Understanding (MoU) between Maharashtra University of Health Sciences and Sun Pharma Industries Limited महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व सन फार्मा इंडस्ट्रिज लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार
Memorandum of Understanding (MoU) between Maharashtra University of Health Sciences and Sun Pharma Industries Limited

यावेळी सन फार्माचे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट अभिजित भटकर यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या मा. कुलगुरु यांच्या संकल्पनेतील ’इक्षणा’ म्युझियम प्रकल्प खरोखर समाजोपयोगी आहे. आरोग्य विषयातील माहिती समाजातील प्रत्येकापर्यंत पोहचण्यासाठी विद्यापीठाच्या प्रकल्पाला सहाय्य करण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी सन फार्मा इंडस्ट्रिज लिमिटेड सी.एस.आर. हेड श्री. चंद्रशेखर गौडा यांनी सांगितले की, विद्यापीठाच ‘इक्षणा’ म्युझियम हा नावीन्यपूर्ण प्रकल्प आहे. आरोग्य क्षेत्रातील माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विद्यापीठाचा अश्या उपक्रमांसाठी आम्ही नेहमीच पुढे राहू. विद्यापीठासमवेत कार्य करण्याची संधी आम्हाला मिळाली हे उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, ’इक्षणा’ म्युझियमचा सामंजस्य करार ही पहिली पायरी असून कामाची हा दिमाखदार प्रकल्प आरोग्य क्षेत्रातील तसेच सर्वसामान्यांसाठी महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.


याप्रसंगी विद्यापीठाचे डॉ. पराग संचेती यांनी या म्युझियमच्या उभारणीसाठी विद्यापीठाच्या ’इक्षणा’ म्युझियमसाठी कार्पोरेट सोशल रिस्पोसिबिलिटी अंतर्गत निधी उभारण्यासाठी कार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.


याप्रसंगी कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ व सन फार्माचे प्रतिनिधी यांनी करारावर स्वाक्षरी करुन सामंजस्य कराराचे आदान-प्रदान केले. या कार्यक्रमाचे समन्वयन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. सन फार्माचे उत्तर महाराष्ट्रातील रिजनल हेड श्री. रमेश येवला यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी श्री. दिप्तेश केदारे, श्री. विनायक ढोले, श्री. पुष्कार तऱ्हाळ, श्री. कृष्णा भवर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com