राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात मौलाना अब्दुल करीम पारेख स्मृती व्याख्यान शुक्रवारी 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात मौलाना अब्दुल करीम पारेख स्मृती व्याख्यानमाला शुक्रवार, दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ०४:०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. महाराज बाग स्थित विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित व्याख्यानमालेत ‘रोल ऑफ रिलीजन इन कॅरेक्टर बिल्डिंग’ या विषयावर हितवादचे संपादक विजय फणशीकर व्याख्यान देणार आहे.

RTM Nagpur University

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ संजय दुधे यांची उपस्थिती राहणार आहे. व्याख्यानमालेला उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ राजू हिवसे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com