डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात माजी केंद्रीय मंत्री तथा लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मतिदिनानिमित्त मंगळवारी अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.

गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण समस्या संशोधन केद्राच्या जीएमएनआरडी सभागृहात हा कार्यक्रम झाला. कुलगुरु डॉ विजय फुलारी, प्र-कुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे व कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनीही गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विभागात अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास कुलपती नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ गजानन सानप प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच डॉ एस टी सांगळे, परीक्षा मंडळ संचालक डॉ बी एन डोळे यांच्यासह अधिकार मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी केंद्राचे संचालक डॉ संजय साळुंके अध्यक्षस्थानी होते. या केंद्राचा अधिक सक्षम करुन लोकाभिमूख करणे गरजेचे असून गोपीनाथराव मुंडे यांच्या स्वप्नातील ग्रामविकासाचे काम या ठिकाणी व्हावे, असे डॉ गजानन सानप म्हणाले. तर केंद्रातर्फे पाणी परिषद घेण्यात आली आगामी काळातही कार्यक्रम घेऊ, असे डॉ संजय सांळुंके म्हणाले. डॉ एस टी सांगळे व डॉ बी एन डोळे यांनीही मार्गदर्शन केले. डॉ शहनवाज शेख यांनी सूत्रसंचालन तर डॉ शैलेश माकणीकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी भगवान फड, सोमीनाथ वाघ, डॉ उषा वाटाणे आदींनी प्रयत्न केले.
