महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

विद्यापीठातर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र प्रदान

नाशिक : सुदृढ आरोग्यासाठी चालण्याचे व धावण्याचे महत्व याबाबत समाजात जनजागृती करण्याच्या उद्ेशाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठतर्फे आयोजित मॅरेथॉन उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभाकरीता आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, शिवछत्रपती राज्यक्रीडा पुरस्कार विजेते राजेश गायकवाड, शिवछत्रपती राज्यक्रीडा पुरस्कार विजेते जय शर्मा, क्रीडा प्रशिक्षक बैजनाथ काळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. समवेत कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), प्र-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी बोधिकिरण सोनकांबळे, डॉ देवेंद्र पाटील, क्रीडा समितीचे अध्यक्ष अॅड संदीप कुलकर्णी, एन व्ही कळसकर, मराठा विद्याप्रसारक संस्थेचे डॉ हेमंत पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी सांगितले की, तंदुरुस्त राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी खेळांमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी स्पर्धकांचा उत्साह स्फुर्तीदायी आहे. पुढील मॅरेथॉनमध्ये विद्यापीठाने होतकरु रनरचाही स्पर्धेत समावेश करावा जेणेकरुन त्यांना स्पर्धेसाठी व्यासपीठ मिळेल. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात क्रीडा स्पर्धा होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते राजेश गायकवाड यांनी सांगितले की, खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खेळ आणि व्यायाम गरजेचे आहे. विद्यापीठाच्या पहिल्या मॅरेथॉनचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले. या मॅरेथॉन रोपटयाचे वटवृक्ष होण्यासाठी आपला सर्वांचा सहभाग आणि सहकार्य महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते जय शर्मा यांनी सांगितले की, दैनंदिन जीवनात शारीरिक व्यायामाचे महत्व अधिक आहे. शारीरिक स्वास्थ्य सुदृढ ठेवण्यासाठी आपला सर्वांचा क्रीडा प्रकारात सहभाग आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, शारीरिक तसेच मानसिक आरोग्य जपण्यासाठी खेळ आणि शारीरिक क्रिया महत्वाच्या आहेत. क्रीडा प्रकारात सहभाग घेतल्याने शरिराला व मनाला नवीन स्फुर्ती मिळते. आरोग्य क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, विद्यार्थी यांनी आपल्या शरिराची काळजी घेणे गरजेचे आहे त्यासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. विद्यापीठातर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत स्पर्धकांचा प्रचंड मोठया प्रमाणात सहभाग उल्लेखनीय आहे. विकसित भारत करीता पुढची पिढी सुदृढ व सशक्त होणे आवश्यक आह यासाठी प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्या असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, व्यायाम प्रकारात चालणे किंवा धावणे ही एक कला आहे. क्रीडा प्रकारात त्याचे उच्चत्तम स्थानावर महत्व आहे. या मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातुन समाजाला निरोगी आयुष्य जगण्याचा संदेश आपण दिला आहे. पुढील मॅरेथॉनमध्ये दहा किमी, पंधरा किमी व वीस किमी इतके अंतर ठेवण्याचा मानस आहेे. ही मॅरेथॉन विनाअरथडा प्रचंड उत्साहाने संपन्न झाल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे क्रीडा समितीचे अध्यक्ष अॅड संदीप कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, विद्यापीठातर्फे पहिल्यांचदा आयोजित मॅरेथॉनला स्पर्धेकांचा मिळालेला मोठा प्रतिसाद वाखानण्याजोगा आहे. कुलगुरु यांनी मॅरेथॉनसाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले. मोठया प्रमाणात सहभागी स्पर्धकांसाठीचे नियोजन करण्यासाठी विविध समित्यांनी केले कार्य उल्लेखनीय असल्याचे त्यांनी संागितले.

मॅरेथॉन स्पर्धेतील विजेते स्पर्धक:

या मॅरेथॉन स्पर्धेत गट ‘अ-1’ दहा कि मी पुरुष (वय वर्षे 40 किंवा त्यापेक्षा जास्त) विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकत्तेर कर्मचारी या गटातील प्रथम क्रमांक रुपेश मार्डा, द्वितीय क्रमांक रामदास गडाख, तृतीय क्रमांक विनोद घोडके, चौथा क्रमांक डॉ गोपाळ शिंदे, पाचवा क्रमांक डॉ संतोष कोकाटे यांनी मिळवला तसेच गट ‘अ-2’ दहा कि.मी. महिला (वय वर्षे 40 किंवा त्यापेक्षा जास्त) विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकत्तेर कर्मचारी या गटातील प्रथम क्रमांक रुचिरा खासने, द्वितीय क्रमांक वर्षा देशमुख, तृतीय क्रमांक सुनिता संकलेचा यांनी मिळवला

तसेच गट ‘ब-1’ दहा कि मी पुरुष (वय वर्षे 40 पेक्षा कमी) विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकत्तेर कर्मचारी या गटातील प्रथम क्रमांक अर्जुन नागलोत, द्वितीय क्रमांक अनिल चौरे, तृतीय क्रमांक पवन गोलवाल, चौथा क्रमांक अनिल गांगुर्डे, पाचवा क्रमांक योगेश सूर्यवंशी यांनी मिळवला तसेच गट ‘ब-2’ दहा कि मी महिला (वय वर्षे 40 पेक्षा कमी) विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकत्तेर कर्मचारी या गटातील प्रथम क्रमांक रुशिका पटेले व द्वितीय क्रमांक प्रिती अग्नी यांनी मिळवला.

Advertisement

गट ‘क-1’ दहा कि मी विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी या गटातील प्रथम क्रमांक अजिंक्य पारडे, द्वितीय क्रमांक नरेश भोये, तृतीय क्रमांक विकास वाळवी, चौथा क्रमांक कुलदीप खरात, पाचवा क्रमांक पवन उखाडे यांनी मिळवला तसेच गट ‘क-2’ दहा कि मी विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थीनी या गटातील प्रथम क्रमांक श्वेता पाटील, द्वितीय क्रमांक स्नेहा बैरागी, तृतीय क्रमांक राजश्री जाधव, चौथा क्रमांक रिंकु वाळवी, पाचवा क्रमांक अर्पिता कुवर यांनी मिळवला.

या मॅरेथॉन स्पर्धेत गट ‘ड-1’ पाच कि मी पुरुष (वय वर्षे 40 किंवा त्यापेक्षा जास्त) विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकत्तेर कर्मचारी या गटातील प्रथम क्रमांक देविदास भदाणे, द्वितीय क्रमांक बोधिकिरण सोनकांबळे, तृतीय क्रमांक संतोष गरुड, चौथा क्रमांक अॅड संदीप कुलकर्णी, पाचवा क्रमांक कैलास उगले यांनी मिळवला. तसेच गट ‘ड-2’ पाच कि मी महिला (वय वर्षे 40 किंवा त्यापेक्षा जास्त) विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकत्तेर कर्मचारी या गटातील प्रथम क्रमांक मेलिसा फर्नाडिस, द्वितीय क्रमांक उज्वला तावरे, तृतीय क्रमांक मिनाक्षी पोतदार, चौथा क्रमांक लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), पाचवा क्रमांक वैशाली भाबड यांनी मिळवला.

गट ‘इ-1’ पाच कि.मी. पुरुष (वय वर्षे 40 पेक्षा कमी) विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकत्तेर कर्मचारी या गटातील प्रथम क्रमांक सत्यम शिंदे, द्वितीय क्रमांक सागर वाटके, तृतीय क्रमांक डॉ गणेश कापसे, चौथा क्रमांक कुणाल तोरणे, पाचवा क्रमांक अजिंक्य रायते यांनी मिळवला तसेच गट ‘इ-2’ पाच कि मी महिला (वय वर्षे 40 पेक्षा कमी) विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकत्तेर कर्मचारी या गटातील प्रथम क्रमांक ज्योती प्रागने, द्वितीय क्रमांक स्वप्नाली शिरोळे, तृतीय क्रमांक शुभांगी कुलाळ, चौथा क्रमांक शालिनी शर्मा, पाचवा क्रमांक श्रीया रघुवंशी यांनी मिळवला तसेच गट ‘फ-1’ पाच कि मी विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी या गटातील प्रथम क्रमांक तेजस धुमाळे, द्वितीय क्रमांक प्रविण शिंदे, तृतीय क्रमांक अक्षय शिरोळे, चौथा क्रमांक नितिन धुम, पाचवा क्रमांक शुभम सुलताने, यांनी मिळवला तसेच गट ‘फ-2’ पाच कि मी विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थीनी या गटातील प्रथम क्रमांक रिना देसाई,  द्वितीय क्रमांक निकिता सापते, तृतीय क्रमांक अलिशिबा मावली, चौथा क्रमांक पुनम वसावे, पाचवा क्रमांक मयुरी पावरा यांनी मिळवला.

या मॅरेथॉन स्पर्धेत गट ‘ग-1’ तीन कि मी पुरुष (वय वर्षे 40 किंवा त्यापेक्षा जास्त) विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकत्तेर कर्मचारी या गटातील प्रथम क्रमांक सिध्देश्वर धापसे, द्वितीय क्रमांक योगिराज पाटील, तृतीय क्रमांक विकास हांडोरे, चौथा क्रमांक रविंद्र रांधव, पाचवा क्रमांक महेंद्रनाथ चौधरी यांनी मिळवला गट ‘ग-2’ तीन कि मी महिला (वय वर्षे 40 किंवा त्यापेक्षा जास्त) विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकत्तेर कर्मचारी या गटातील प्रथम क्रमांक ज्योती बडवे,  द्वितीय क्रमांक डॉ प्रज्ञा देशमुख,  तृतीय क्रमांक शितल शिंदे, चौथा क्रमांक साक्षी वाघमारे, पाचवा क्रमांक मनिषा शिंदे यांनी मिळवला.

गट ‘ह-1’ तीन कि मी. पुरुष (वय वर्षे 40 पेक्षा कमी) विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकत्तेर कर्मचारी या गटातील प्रथम क्रमांक योगेश राऊत, द्वितीय क्रमांक अभिजित राठोड, तृतीय क्रमांक सागर राऊत, चौथा क्रमांक संदीप खांडवे, पाचवा क्रमांक महेश कळमकर यांनी मिळवला तसेच ‘ह-2’ तीन कि मी महिला (वय वर्षे 40 पेक्षा कमी) विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकत्तेर कर्मचारी या गटातील प्रथम क्रमांक ज्योती खांडे, द्वितीय क्रमांक डॉ दीप्ती पी, तृतीय क्रमांक स्मिता वसावे, चौथा क्रमांक कल्याणी भुजबळ, पाचवा क्रमांक प्रतिक्षा शर्मा यांनी मिळवला.

‘आय-1’ तीन कि मी विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी या गटातील प्रथम क्रमांक गोपाल मसुले, द्वितीय क्रमांक रामदास पावरा, तृतीय क्रमांक कृष्णा गावीत, चौथा क्रमांक हितेश पाटील, पाचवा क्रमांक बिसन बारेला, यांनी मिळवला तसेच ‘आय-2’ तीन कि मी विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थीनी या गटातील प्रथम क्रमांक संस्कृती जाधव, द्वितीय क्रमांक अपूर्वा मावची, तृतीय क्रमांक अनिता भांजे, चौथा क्रमांक पूर्वा तिडमे, पाचवा क्रमांक धनश्री पाटील यांनी मिळवला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख अतिथी व संलग्नित महाविद्यालयाचे प्रतिनिधी यांचा विद्यापीठ परिवारातर्फे स्वागत व सत्कार करण्यात आला. विद्यापीठाशी संलग्नित गणपतराव आडके परिचर्या महाविद्यालयाचे एस एन राघवेंद्र, एस एम बी टी महाविद्यालय इगतपुरीचे डॉ मंदार जाधव, मराठा विद्या प्रसारक संस्था फिजिओथेरपी महाविद्यालयाचे डॉ निरंजन नाशिककर यांचा विद्यापीठातर्फे सत्कार करण्यात आला.

या पारितोषिक वितरण समारंभात विजेत्यांची नावे मराठा विद्या प्रसारक संस्थचे प्रा डॉ हेमंत पाटील यांनी घोषित केले. दहा किमी मॅरेथॉनचा प्रारंभ विद्यापीठ मुख्यालयातून करण्यात आला. तसेच पाच किमी स्पर्धेचा आकाश पेट्रोलपंप येथून व तीन किमी मॅरेथॉन स्पर्धेचा कुलकर्णी फार्म येथून हिरवा ध्वज दाखवून प्रारंभ करण्यात आला. मॅरेथॉन सुरु होण्यापुर्वी स्पर्धकांकडून वार्मअपसाठी नाशिक येथील मोतिवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे विद्यार्थ्यांनी गणेशवंदना सादर केली तसेच डॉ वैभव महाजन व चमूने स्पर्धकांकडून झुंबा डान्स करुन घेतला.

या मॅरेथॉन स्पर्धेकरीता विद्यापीठाची क्रीडा समिती, विविध गठीत समिती सदस्य, विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. पारितोषिक वितरण समारंभास स्पर्धेक, विद्यार्थी व महाविद्यालयाचे संघ प्रमुख मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page