शिवाजी विद्यापीठात मराठी विकिपीडिया प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ व भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी विकिपीडिया प्रशिक्षण कार्यशाळा’ दि. २४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत, राजर्षी शाहू सभागृह येथे अयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचे मुख्य अतिथी लक्ष्मीकांत देशमुख (अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य ) यांनी कार्यशाळा आयोजित करण्याचा हेतू स्पष्ट केला. सदर कार्यशाळेस प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. राहुल देशमुख (आय. आय. टी., मुंबई) यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत मराठी साहित्य आणि कोशीय लिखाण, मराठी विकिपीडियाची गरज, विकिपिडिया संकल्पना, तत्वे, उद्देश, मालकी, वापर आदी. ची माहिती देण्यात आली. तसेच अस्मिता अबनावे (आय. आय. टी., मुंबई) यांनी मराठी विकिपीडियावर लेख लिहीणे, माहितीचे अद्यावती करण करणे, चित्रे, संदर्भ लावणे या संदर्भात माहिती दिली. या कार्यशाळेत शिवाजी विद्यापीठ व संलग्नीत महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, तंत्रज्ञान अधिविभाचे संचालक प्रा. डॉ. एस. एन. सपली, शरद यादव सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य उपस्थित होते. या कार्यशाळेचे आयोजन तंत्रज्ञान अधिविभाचे सहाय्यक प्राध्यापक चेतन आवटी व डॉ. रश्मी देशमुख यांनी केले. या कार्यशाळेस अमृता मांजरेकर, रुपाली धाबर्डे, हृदयनाथ खंडागळे, हेमंत तिरमारे, अमरजा भोसले, ऐश्वर्या चव्हाण यांचे सहकार्य लाभले.