२२ जानेवारीला गोंडवाना विद्यापीठात मराठी विश्वकोश आणि कुमार विश्वकोश परिचय कार्यशाळा

गडचिरोली : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभाग, गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडवाना विद्यापीठात बुधवार, दिनांक २२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०:३० ते ४:०० या वेळेत मराठी विश्वकोश आणि कुमार विश्वकोश परिचय कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

Gondwana University GUG Gadchiroli

विश्वकोशातील अद्ययावत माहिती आणि संशोधन जिज्ञासू वाचकापर्यंत पोहोचविणे, तज्ज्ञांना लेखन कार्यात सहभागी करून घेणे या उद्देशाने ही कार्यशाळा घेण्यात येणार असून मराठी भाषा विभागांतर्गत असलेल्या विज्ञान-तंत्रज्ञान, कला व वाणिज्य आदी विभागातील संशोधक विद्यार्थी, अभ्यासक व प्राध्यापक यांना यामध्ये नोंदणी करून सहभागी होता येईल. सदर कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ रवींद्र शोभणे, विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ अनिल हिरेखण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

पहिल्या सत्रात ‘अभिजात मराठी आणि विश्वकोश नोंदीचे महत्त्व’ या विषयावर डॉ गजानन कोर्तलवार, सहयोगी प्राध्यापक व मराठी विभाग प्रमुख, श्री ज्ञानेश महाविद्यालय, नवरगाव, दुसऱ्या सत्रात ‘मराठी विश्वकोश आणि लेखनसंहिता’ या विषयावर सरोजकुमार मिठारी, विद्याव्यासंगी सहायक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, तिसऱ्या सत्रात ‘कुमार विश्वकोश आणि विज्ञानविषयक कोशीय लेखन’ या विषयावर डॉ स्नेहा खोब्रागडे, विद्याव्यासंगी सहायक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आदी तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. चौथ्या सत्रात खुली चर्चा घेतली जाईल.

सदर कार्यशाळेसंबंधी गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांना सुचित करण्यात आले असून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर संबंधित माहितीपत्रक व गुगल लिंक प्रकाशित करण्यात आलेली आहे. ज्यांना संबंधित विषयातील लेखन कार्यात रुची आहे, त्यांनी कार्यशाळेत अवश्य सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यशाळा समन्वयक रवीन्द्र घोडराज, विद्याव्यासंगी सहायक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व डॉ सविता गोविंदवार, सहायक प्राध्यापक, पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com