डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसरात “मॅनेजमेंट फेस्टिवल” उत्साहात साजरा

अमेरिकेमधून माजी विद्यार्थ्याने केले ऑनलाईन उदघाटन

”कार्पोरेट” च्या धरती वरती “इंडक्शन” प्रोग्रामचा देखील समावेश

धाराशिव : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उप परिसर धाराशिव येथील व्यवस्थापन शास्त्र विभागा मार्फत “मॅनेजमेंट फेस्टिवल” चे आयोजन दिनांक ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर २०२४ दरम्यान करण्यात आले. फेस्टिवलची सुरवात “इंडक्शन” कार्यक्रमाने करण्यात आली. कार्पोरेट च्या धरती वरती नवीन कर्मचारी कार्यालयात रुजू झाल्यवारती त्याला तेथील व्हिजन, कार्य पद्धती, नियमावली आणि ओळख या इंडक्शन स्वरुपात घेतली जाते. त्यानुसारच विद्यार्थ्यांना याची सवय शिक्षण घेत असतानाच असावी या साठी सदर कार्यक्रम घेतला गेला.

उद्घाटन प्रसंगी विभागाचे माजी विद्यार्थी आणि सध्या अमेरिका मधील फ्लोरिडा येथील नामवंत कंपनी एफ आय एस येथे कंसंलटंट म्हणून कार्यरत असणारे शोभिवंत माने यांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील आहे म्हणून न्यूनगंड बाळगण्यापेक्षा त्याचे आत्मविश्वासात रुपांतर करा आणि आपले कौशल्य अपग्रेड करत रहा असे त्यांनी संबोधले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ सुयोग अमृतराव हे होते. त्यांनी विभागाचा प्रवास आणि पुढील नियोजन सांगितले. विभागातील डॉ विक्रम शिंदे हे संशोधक मार्गदर्शक झाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात अविष्कार व राष्ट्रीय स्तरावर्ती क्रीडा प्रकारात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. फेस्टिवल समन्वयक सचिन बस्सैये, वरून कळसे आणि सुप्रिया सुकाळे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Advertisement

पुढील सत्रात विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी विविध क्रीडा प्रकार व स्पर्धेचे आयोजन केले गेले होते. तसेच दिनांक १ डिसेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आला यात सर्वांनी सहभाग नोंदवला. विविध नाविन्यपूर्ण अनुभव या दोन दिवसात विद्यार्थ्यांना मिळाले. सर्वांच्या उत्कंठेचा विषय म्हणजे “मिस आणि मिस्टर युडीएमएस” यांची निवड विविध फेऱ्यामधून करण्यात आली. बक्षीस समारंभात विविध स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. या वर्षी मिस आणि मिस्टर यु डी एम एस म्हणून अनुक्रमे मितीला वाघमारे आणि अभिजित गवळी यांची निवड करण्यात आली.

यावेळी “मॅनेजमेंट फेस्टिवल” यशस्वी करण्यासाठी सचिन बस्सैये, एमबीए आणि एमसीए चे विद्यार्थी यांनी मेहनत घेतली. सदर कार्यक्रमासाठी विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page