मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम’चे ११ मे रोजी शिवाजी विद्यापीठात आयोजन
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट विभागामार्फत ‘फ्युचर ऑफ वर्क, वर्कप्लेस अँड ह्यूमन रिसोर्स’ या विषयावर एक दिवसीय मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन केले आहे. शनिवार दि ११ मे २०२४ रोजी हा कार्यक्रम शिवाजी विद्यापीठाच्या शाहू सभागृह येथे होणार आहे.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात प्रसिद्ध विधिज्ञ आदित्य जोशी, विधीज्ञ अभय नेवगी व विधीज्ञ दिपक जोशी हे ‘कामगार आणि उद्योगामधील नवीन कायद्यातील ट्रेंडचा काम, कार्यस्थळ आणि मानवी संसाधनांवर प्रभाव’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ‘अनिश्चिततेचे मार्गनिर्देश बदल अनुकूल करणे आणि गतिमान कार्य वातावरणात कर्मचाऱ्यांमध्ये लवचिकता वाढवणे’ या विषयावर कल्याणी ग्रुपचे मानव संसाधन विभागाचे प्रमुख अरुण फुलेरा, के एस बी इंडियाचे उपाध्यक्ष- मानव संसाधन व्यवस्थापक मोहन पाटील, भारत फोर्जचे संचालक मानव संसाधन व्यवस्थापक डॉ संतोष भावे हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी आयोजित चर्चासत्रात अरुण फुलेरा तसेच विलो माथेर आणि प्लॅट पंप्स प्रा लि चे मानव संसाधन व्यवस्थापक नितीन असलकर व भारत फोर्जचे मानव संसाधन व्यवसाय भागीदार श्रेयश किरपेकर, हे तज्ज्ञ ‘कामाच्या वातावरणावर नवीन तंत्रज्ञानाचा प्रभाव’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. ‘उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील दरी कमी करणारे सहकार्य वाढवणे‘ या विषयावरील चर्चासत्रात शिवाजी विद्यापीठाचे वाणिज्य विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा डॉ एस एस महाजन, टेक महिंद्रा हायरिंग अँड ट्रेनिंगचे प्रमुख उमेश गंजले तसेच
व रामचंद्रन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या अधिष्ठाता प्रा डॉ मनीषा संक्षेना मार्गदर्शन करणार आहेत.
या मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ डी टी शिर्के व प्र कुलगुरू डॉ पी एस पाटील अध्यक्षस्थानी असणार आहेत. त्याचबरोबर संचालक औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य अभिजित अवसरे कोल्हापूर, क्याडमॅक्स एजुकेशन सोलुशन बेंगलोरचे संचालक अरुणकुमार पाटील, तसेच डी के टी ई टेक्सटाईल व इंजिनीरिंग सोसायटीच्या सचिव डॉ सपना आवाडे उपस्थित राहणार आहेत.
विविध कंपन्यांचे मानव संसाधन विभागातील अधिकारी, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी सहाभागी होऊ शकतात. त्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळवर ६ में २०२४ पर्यंत ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन या कार्याक्रमचे संयोजक डॉ अमोल मिन्चेकर व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट प्र-संचालक डॉ नितीन माळी यांनी केले आहे.