राजमाता जिजाऊ वरिष्ठ महाविद्यालयात “महावाचन उत्सव – २०२४” मोठ्या उत्साहात संपन्न

महावाचन उत्सव 2024 निमित्त महाविद्यालयात ग्रंथ दिंडी चे आयोजन व तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शन

घोडेगाव : राजमाता जिजाऊ वरिष्ठ महाविद्यालय, राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय, सद्गुरू जनेश्वर माध्यमिक विद्यालय व स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय घोडेगाव येथे महावाचन उत्सव – २०२४ निमित्त महाविद्यालयात ग्रंथ दिंडी चे आयोजन व तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शन घेण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन साईनाथ पाटील जाधव साहेब हे होते.तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्‌घाटक विलास केवट साहेब (गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती, खुलताबाद), नदीम शेख सर ( केन्द्र प्रमुख केंद्रीय प्राथमिक शाळा, गदाना), बांदल सर (माजी प्राचार्य, गंगापूर) हे होते.

प्रथमतः विद्यार्थ्यांची ग्रंथ दिंडी निघाली.त्यामध्ये विद्यार्थी पारंपारिक वेषात टाळ, घोषवाक्य घेऊन निघाले.यानंतर दिंडीमध्ये अध्यक्ष व प्रमुख पाहुणे सुध्दा सामील झाले. केवट साहेब यांच्याहस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिते सर यांनी केले तर आभार प्रशासकीय अधिकारी गोमलाडु सर यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी होण्यास प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com