श्री बंकटस्वामी महाविद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
ज्योतिबांचा शिक्षक धर्म व सत्यधर्म जोपासावा – प्रा डॉ राजीव काळे
बीड : श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक मिरगणे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रा डॉ राजीव काळे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार सर्व क्षेत्रांमध्ये उपयोगी आहेत पर्यावरण विचार, शेती विषयक विचार तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये देखील उपयोगी आहेत. परंतु दुर्दैवाची गोष्ट आज माणूस शिक्षणाने शिक्षित झाला परंतु सुसंस्कारी मात्र झाला नाही, महापुरुषांना हे अपेक्षित नव्हते विशिष्ट जाती-धर्मात महापुरुषांना बांधण्याचे काम शैक्षणिक क्षेत्रातील लोकांकडून देखील सुरू असल्याचे आज समाजामध्ये चित्र दिसून येते परंतु शिक्षकांनी शिक्षक धर्म पाळला आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा सत्यधर्म आचरणात आणला तर समाजाची प्रगती होईल. तसेच अशा महापुरुषांचे आदर्श आपण शैक्षणिक क्षेत्रातील लोकांनी समाजापुढे आणले पाहिजे अनुकरण केले पाहिजे. कारण महात्मा ज्योतिबा फुले यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांच्यातून त्यांनी प्रेरणा घेऊन त्याकाळी असणाऱ्या समाजातील अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी स्त्रियांचे शिक्षण किती महत्त्वाचे आहे आणि शिक्षणाशिवाय माणसाची समाजाची प्रगती नाही हे त्यांनी त्या काळी ही सांगितले, परंतु आज पुन्हा त्यांचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
तसेच या कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक मिरगणे यांनी देखील आपले मत व्यक्त केले. महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आपण त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने कृतीमध्ये आणण्याचा संकल्प करूया. शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना आपण आपला शिक्षक धर्म पाळला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना ज्ञानी बनवणे तसेच नवीन संशोधन करण्यासाठी प्रवृत्त करणे त्यांच्यामध्ये असणाऱ्या क्षमतांची जाणीव करून देणे तसेच महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करण्यासाठी महापुरुषांचे विचार आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोचविले पाहिजे आणि त्यासाठी आपण आपला शिक्षक धर्म जपला पाहिजे असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ मनोजकुमार नवसे, डॉ शंकर शिवशेट्टे, डॉ शंकर धांडे राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख डॉ जगन्नाथ चव्हाण प्रा रणजीत आखाडे संभाजी गायकवाड, डॉ जयद्रथ मगर, डॉ चव्हाण या प्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य शिक्षक प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.