महात्मा गांधीजींच्या विचारांची आज गरज – डॉ. के. के. कलाने
महात्मा गांधी व्याख्यानमालेचे चतुर्थ पुष्प संपन्न
बीड: येथील मिल्लिया कला विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या इतिहास विभाग व विद्यार्थी कल्याण विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महात्मा गांधी आणि भारतीय स्वातंत्र्यलढा या व्याख्यानमालेचे चतुर्थ पुष्प गुंफण्यात आले. या प्रसंगी प्रमुख वक्तते प्रमिलादेवी पाटील महाविद्यालय नेकनूर चे इतिहास विभाग प्रमुख डॉ. के. के. कलाने, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ . सय्यद हनीफ, उपप्राचार्य डॉ. हुसैनी एस.एस,इतिहास विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. शेख कलीम मोहिउद्दिन, डॉ. शेख हुसैन इमाम यांची उपस्थिती होती.
प्रमुख वक्तते डॉ. के.के. कलाने यांनी महात्मा गांधीजीच्या विचारांची आज गरज असून, त्यांनी अहिंसेच्या माध्यमातून लढून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींचे योगदान खूप मोलाचे आहे व जगात सर्वच लोक गांधीजींना मानतात असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ यांनी महात्मा गांधींचे विचार आपल्या सर्वांना प्रेरणा देणारे आहेत त्यांनी अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. शेख कलीम मोहिउद्दिन यांनी केले तर आभार डॉ. शेख हुसैन इमाम यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास विद्यार्थी- विद्यार्थिनी प्राध्यापक वृंद यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहम्मद इलयास फाजील यांचे मार्गदर्शन लाभले.