महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचा अयोध्या शोध संस्थानशी सामंजस्य करार
वर्धा, 20 जुलै : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा आणि अयोध्या शोध संस्थान यांच्यात गुरुवार, 20 रोजी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. विश्वविद्यालयाच्या वतीने कुलसचिव क़ादर नवाज़ ख़ान यांनी तर उत्तर प्रदेश सरकारच्या संस्कृती विभागा अंतर्गत संचालित अध्योध्या शोध संस्थान, अयोध्या येथील निदेशक डॉ. लवकुश द्विवेदी यांनी या करारावर स्वाक्षरी केली. याप्रसंगी कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्ल प्रामुख्याने उपस्थित होते.
या करारा अंतर्गत जगभरात रामायण व राम कथा परंपरेला चालना देणे संरक्षण करणे, संशोधन करणे, उभय संस्थांमध्ये आंतर-सांस्कृतिक संबंध विकसित करणे, रामायण व राम कथा परंपरेचे संस्कृत व अन्य भाषांमध्ये भाषांतर करणे, व्याख्यानांचे आयोजन करणे, पांडुलिपींचे प्रकाशन व संवर्धन करणे, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे इत्यादी विषयांचा समावेश आहे. कुलगुरु प्रो. शुक्ल यांनी विश्वास व्यक्त केला की हा करार नव भारताकरिता उपयोगी सिद्ध होईल. डॉ. लवकुश द्विवेदी म्हणाले की राम कथेशी संबंधित विषयांवर शोध, संरक्षण आणि प्रलेखीकरण या अंतर्गत केले जाईल. याप्रसंगी आवासीय लेखक प्रो. रामजी तिवारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील हिंदी विभागाच्या प्रो. भारती गोरे, हिंदी साहित्य विभागाच्या अध्यक्ष प्रो. प्रीती सागर, साहित्य विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो. अवधेश कुमार, डॉ. रामानुज अस्थाना यांच्यासह अधिष्ठातागण, विभागाध्यक्ष, अध्यापक, शोधार्थी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.