सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात थोर समतानायक, क्रांतीकारक महात्मा बसवेश्वर यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली. कुलगुरू प्रा प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. खुली निबंध स्पर्धा व वचन अनुवाद स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला. जयंतीदिनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन प्र-कुलगुरू प्रा लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते झाले.

यावेळी ज्येष्ठ लेखिका डॉ अपर्णा जिरवणकर यांचे व्याख्यान पार पडले. महात्मा बसवेश्वर यांचे जीवन आणि कार्य हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी व्यासपीठावर महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ प्रभाकर कोळेकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ राजेंद्र वडजे आदींचे प्रमुख उपस्थिती होती. डॉ प्रसंगी डॉ कोळेकर यांनी महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राच्या कार्याचा आढावा घेतला .

Advertisement

यावेळी बोलताना डॉ जिरवणकर म्हणाल्या की, बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी समाज सुधारण्याचे महान कार्य करून जगाला समता व बंधुत्वाची शिकवण दिली. त्याकाळी त्यांनी जाती निर्मूलनाचे कार्य करून एक आदर्श या जगासमोर ठेवला. त्यांचे कार्य आजही आदर्श व प्रेरणादायी आहे. सोलापूर विद्यापीठामध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या वचनावर विपुल संशोधन होऊन त्यातून मोठ्या प्रमाणात ग्रंथ निर्माण व्हावे. त्यांच्या वचनांचा युवा पिढीने अभ्यास करून आदर्श समाज घडविण्यासाठी युवकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

अध्यक्षीय भाषणात प्रा डॉ दामा यांनी सोलापूर परिसरातील कन्नड भाषिकांनी आणि मराठी भाषिकांनी महात्मा बसवेश्वर यांच्या वचनातून मानवतावादी व लोकशाही रचना बळकट होण्यासाठी कार्य करावे, असे आवाहन केले. या प्रसंगी महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राच्या सल्लागार समितीचे सदस्य प्रा गाजानन धरणे, डॉ घुली, राहुल पावले, शहापूरकर, न्हावकर, प्रा देवानंद चीलवंत, चन्नविर बंकुर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page