महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रवेशाकरीता १२ ऑगस्ट पर्यंत मुदत
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे आरोग्य शिक्षणातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे. फेलोशिप इन पंचकर्म थेरपी, पंचकर्म टेक्निशिअन, फेलोशिप इन योगा थेरपी या फेलोशिप व प्रमाणपत्र अभ्यासक्रमास प्रवेश प्रक्रियेची अंतीम मुदत दि 12 ऑगस्ट 2024 आहे.
विद्यापीठाचे प्रति – कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या आयुष विद्यापीठातर्फे ‘फेलोशिप इन योगा थेरपी’ हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला असून आरोग्य शिक्षणातील एम बी बी एस, बी डी एस, बी ए एम एस, बी एच एम एस, बी पी टी एच, बी यु एम एस, विद्याशाखेमध्ये पदवीधर विद्यार्थी ”फेलोशिप इन योगा थेरपी” या अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेऊ शकतात. सदर अभ्यासक्रम ऑनलाईन व ऑफलाईन उपरोक्त अशा संमिश्र पध्दतीने सुरु करण्यात आला आहे जेणेकरुन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग करुन घेता येईल असे त्यांनी सांगितले.
आयुर्वेद विद्याशाखेमध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर पंचक्रर्म या विषयात प्राविण्य मिळावयाचे असल्यास ”फेलोशिप इन पंचकर्म थेरपी” हा कोर्स सदर विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारा आहे. तसेच विद्यापीठातर्फे बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ”पंचकर्म टेक्निशिअन” हा कोर्स सुरु करण्यात आला आहे. पंचकर्म टेक्निशिअन कोर्स पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पंचकर्म सेंटर, आयुर्वेदिक कॉलेज आणि हॉस्पिटल येथे रोजगाराच्या मोठया प्रमाणात संधी उपलब्ध आहेत.
विद्यापीठाचे फेलोशिप इन पंचकर्म थेरपी, पंचकर्म टेक्निशिअन, फेलोशिप इन योगा थेरपी अभ्यासक्रमाच्या अंतिम मुदत दि 12 ऑगस्ट 2024 आहे. या अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी विद्यापीठाचे www.muhs.ac.in अधिकृत संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे तसेच अधिक माहितीसाठी 0253-2539122, 0253-2539131 किंवा 0253- 6659125 या दूरध्वरनी क्रमांकावर संपर्क साधावा.