सौ के एस के महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

बीड : सौै केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात 1 मे महाराष्ट्र दिना निमित्त नवगण शिक्षण संस्था राजुरी नवगणच्या उपाध्यक्ष प्राचार्य डॉ दीपा क्षीरसागर मार्गदर्शनानुसार प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजा रोहन व यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून एन सी सी कँडेटनी ध्वजास राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने मानवंदना दिली.

Advertisement

या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ सतीष माऊलगे, कमवि उपप्राचार्य डॉ नारायण काकडे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर, क्रीडा संचालक डॉ भागचंद सानप, डॉ सुधाकर गुट्टे, कार्यालयीन अधिक्षक डॉ विश्वांभर देशमाने तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *