राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात महाराणा प्रतापसिंह जयंती उत्साहात साजरी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात महान योद्धा महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गुरुवारी, २९ मे रोजी जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमात महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. हा सोहळा सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी अधीक्षक श्री. शैलेश राठोड यांच्या शुभहस्ते पार पडला. कार्यक्रमाचे मार्गदर्शन माननीय प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे), प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार आणि कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी केले.
यावेळी कुलगुरूंचे स्वीय सहाय्यक श्री. नितीन खरबडे यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराणा प्रतापसिंह यांच्या शौर्य आणि देशभक्तीचे स्मरण करत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.